विशेष प्रतिनिधी
भारताची सत्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हाती असतानाही जावेद अख्तर सारखे देशद्रोही देशात सुरक्षित असताना विषारी फुत्कार सोडत आहे, अशी जहरी टीका भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.Javed Akhtar Staying in the country safely and Releaseing poisonous word: bhosnsle
गीतकार जावेद अख्तर यांनी नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेची तालिबानशी तुलना करून नवा वाद निर्माण केला. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर ते बोलत होते.
ते म्हणाले, तालिबानीचा डीएनए असलेले जावेद अख्तर सारखे देशद्रोही भारतात सुरक्षितपणे राहतात आणि वाट्टेल तसे विषारी फुत्कार सोडतात. संघाचे धोरण आणि विचारधारा सर्वसमावेशक आहे. देशद्रोह्यांना स्थान नाही हे लक्षात घ्यावे. पण भेदवृत्ती असलेल्या या समाजकंटकांना कसे कळणार ?
https://www.youtube.com/watch?v=uZA6ixFz-jk
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App