विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताकडून कांद्यावर वारंवार निर्यातबंदी आणली जात असल्यावर जपान आणि अमेरिकेने आक्षेप घेतला आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकीत कांद्याच्या निर्यातीवर भारताने वारंवार बंदी घातल्याबद्दल अमेरिका आणि जपान यांनी कडाडून विरोध केला आहे. पूर्वसूचनाशिवाय अशा बंदीमुळे आयात होणाऱ्या देशांना अडचणीत आणले जाते.Japan, US object to India’s repeated ban on onion exports
कांद्याचा भाव हा राजकीयदृष्टया अत्यंत संवेदनशिल आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात कांद्याच्या किंमती वाढल्या की सरकारकडून निर्यातबंदी लागू होते. भारत सरकार निर्यातीचा विशिष्ट कोटा का ठरवून देत नाही असा सवाल जपान आणि अमेरिकेने केली आहे.
त्याचबरोबर बांगलादेश आणि नेपाळसारखे देशही भारतीय कांद्यावर जास्त अवलंबून आहेत. त्यामुळे या देशांकडून कांदा निर्यातबंदीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही हा मुद्दा दिल्लीतील एका व्यासीपीठावर उपस्थित केला होता. केला होता.
सप्टेंबर २०२० मध्ये एप्रिल ते जुलै या कालावधीत नियार्तीत३० टक्के वाढ झाल्याने सरकारने सर्व प्रकारच्या कांद्याच्या नियार्तीवर बंदी घातली. ऑ क्टोबर २०२० मध्ये वाणिज्य मंत्रालयाने काही निर्बंध कमी केले आणि बेंगळुरूच्या कांद्याची निर्यात केली. कृष्णापुरम कांद्याच्या निर्यातीत दहा हजार टनाने वाढ झाली. 1 जानेवारी रोजी सरकारने नवीन पिकाची आवक झाल्यानंतर देशांतर्गत बाजारात दर कमी होऊ लागल्याने निर्यातीवरील सर्व निर्बंध हटवले.
आर्थिक वर्ष २०२० मध्ये भारताने अफगाणिस्तान, तुर्की आणि इजिप्त येथून ८० दशलक्ष डॉलर्स किंमतीचा कांदा आयात केला होता. २०२१ मध्ये भारताने ३७८ दशलक्ष डॉलर्सची कांदा निर्यात केली. मागील वर्षीच्या तुलनेत ही १५ टक्यांनी जास्त होती. यामध्ये बांगलादेश (१०१ दशलक्ष डॉलर्स), मलेशिया (६२ दशलक्ष डॉलर्स), संयुक्त अरब अमिराती (४४ दशलक्ष डॉलर्स) आणि श्रीलंका (४२ दशलक्ष डॉलर्स) या देशांत सर्वाधिक निर्यात झाली होती.
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोले म्हणाले की, भारत हा कांदा उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असला तरी कांद्याबाबत कोणतेही ठोस धोरण नाही. निर्यातीवरील अनियमित बंदीमुळे कांदा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता जागतिक व्यापार संघटनेत हा मुद्दा उपस्थित झाल्याने केंद्र सरकारने ठोस निर्यात आणि आयात धोरणाबाबत निर्णय घेतला पाहिजे.
फलोत्पादन निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष अजित शहा म्हणाले की, भारताच्या धरसोड धोरणामुळे पाकिस्तान, तुर्की आणि इजिप्तसारख्या देशांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाऊल ठेवले आहे. यावर्षी सप्टेंबर २०२० ते जानेवारी या कालावधीत कांद्याची निर्यात झालेली नाही. याचे कारण म्हणजे सरकारने चार ते सहा वेळा निर्यातीवर बंदी घातली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App