सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले Jammu and Kashmir
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीर विधानसभेत आज चांगलाच गदारोळ झाला. कलम 370 वरून सभागृहात गदारोळ झाला. सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.
इंजीनिअर रशीद यांचे भाऊ आणि आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी कलम 370 वर बॅनर दाखवल्यानंतर श्रीनगरमधील जम्मू-काश्मीर विधानसभेत गोंधळ झाला. त्यावर विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी आक्षेप घेतला. सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले
इरान हाफिज लोनने जम्मू-काश्मीर विधानसभेत बॅनर दाखवले. इरफान हाफिज लोन आणि भाजप सदस्यांमध्ये बाचाबाची झाल्याने सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. अशा गोष्टींना परवानगी कशी दिली जाते, यावर भाजपने आवाज उठवला.
बुधवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत सभागृहाच्या कामकाजादरम्यान कलम 370 च्या मुद्द्यावरून पुन्हा गदारोळ झाला. तत्पूर्वी, नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा परत करण्याची मागणी करणारा ठराव सभागृहात मांडण्याचा आग्रह धरला, त्याला भाजप आमदारांनी विरोध केला. यावरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार वादावादी झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App