विशेष प्रतिनिधी
मुंबई : Prakash Ambedkar मनोज जरांगेंनी सगळ्यांना अर्ज भरायला लावले. नंतर निजामी मराठ्यांच्या बैठका घेतल्या. काही ठिकाणी गरीब मराठा आणि काही ठिकाणी ओबीसी उमेदवार उभे केले आणि इतर ठिकाणी मराठा विरूद्ध मराठा असे चित्र निर्माण केले. मराठा आमदार कसे निवडून येतील यानुसारच मराठा वर्चस्वासाठी आखणी केली. मनोज जरांगेंच्या या खेळात शरद पवार सामील आहेत, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा मनोज जरांगेंवर ताशेरे ओढले.
त्याचबरोबर या खेळात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र असल्याचाही दावा प्रकाश आंबेडकरांनी केला. जरांगेंचा डाव लक्षात घेऊनच ओबीसींनी मतदान करण्याचे त्यांनी आवाहन केले.
– प्रकाश आंबेडकर म्हणाले :
– ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने थांबवण्यात आले आहे. उद्या विधानसभेच्या माध्यमातून शिक्षण आणि नोकऱ्यांमधील आरक्षण थांबवले जाईल, हे आपल्याला मान्य आहे का? असा सवाल उपस्थिता करत ‘मान्य नसल्यास किंतु, परंतुची चर्चा न करता वंचित बहुजन आघाडीने उभे केलेल्या उमेदवारांना मतदान करा.
– मनोज जरांगे आणि शरद पवार यांची जी घोषणा आहे, 200 आमदार विधानसभेत असतील. याच्याच अंमलबजावणीला आता सुरुवात केली आहे. मराठ्यांनी मराठ्यांनाच मतदान दिले पाहिजे, असा त्यांचा निर्णय झाला आहे. आता ओबीसींनी आरक्षण वाचवण्यासाठी वंचितच्या उमेदवारांना मत देण्याची भूमिका घेतली पाहिजे. ही भूमिका जर बजावली तरच ओबीसींचे उमेदवार निवडून येतील.
– एक प्रचार निश्चित केला जाणार की, धर्म संकटात आहे. पण मी तमाम ओबीसींना विचारतो की, आपण आपल्या वाडवडिलांच्या, पूर्वजांचा धर्म सोडणार आहात का ? तो आपण मुघलांच्या काळात सोडला नाही, तर आताच्या काळात कसा सोडणार? ही चर्चा निरर्थक आहे. ही चर्चा भाजप, आरएसएस, बजरंग दल, हिंदू महासभा यांच्यामार्फत केली जाते. पण तुम्ही त्यांना विचारा की, तुम्ही आमच्या आरक्षणाच्या बाजूने का नाही. ओबीसी आरक्षणाचे समर्थन आपण का करत नाही. धोका धर्माला नसून आरक्षणाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App