दोन केनियन महिलांना अटक, पाच तरूणींची सुटका अन्य एका आरोपीचा शोध सुरू
विशेष प्रतिनिधी
पणजी : पेमेंटचा एक प्रकार म्हणून UPI ला लोकप्रियता मिळत असताना, गोवा पोलिसांना नुकतेच एका आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करताना यूपीआयचा वापर किती व्यापक प्रमाणात आणि कुठे कुठे केला जात आहे, याचा प्रत्यय आला आहे. गोव्यात असलेल्या परंतु केनियामधून चालवलेल्या या ऑपरेशनमध्ये पीडित सेक्स वर्कर्सचा समावेश होता ज्यांना पेमेंटसाठी ग्राहकांना QR कोड पुरवले गेले होते, जे नंतर संपूर्णपणे तस्करांना हस्तांतरित केले जायचे. यामध्ये QR कोड वापरून UPI पेमेंट सामान्यतः व्यवहाराच्या सुरुवातीच्या टप्प्यावर केले जायचे, जेणेकरून क्लायंट नंतर पीडिताला पैसे देण्यापासून सुटू नये. International sex racket busted in Goa customers forced to pay using QR code
याप्रकरणी अंजोना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी माहिती देताना सांगितले की, पोलिसांनी याप्रकरणी मारिया डोरकास आणि विलकिस्टा एक्सटा या दोघांनी अटक केली असून दोघीही केनियन नागरिक आहेत आणि त्या गोव्यात सेक्स रॅकेटचा भाग चालवात होत्या.
याशिवाय त्यांच्या तावडीतून एका एननजीओच्या मदतीन सुटका करण्यात आलेल्या पाच पीडित तरुणीही केनियन आहेत. पोलिस आता अटक करण्यात आलेल्या दोन महिलांचा नायजेरियन साथीदाराचा शोध घेत आहेत.
पीडित तरुणींना मसाज पार्लर आणि हॉटेलमध्ये काम देण्याच्या नावाखाली केनियातून आणण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांना येथे आणल्यानंतर त्यांची कागदपत्रे काढून घेण्यात आली आहेत. सध्या पीडित तरुणींची चौकशी केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App