वृत्तसंस्था
टोरंटो : कॅनडातील 20 लाख भारतीय वंशाच्या लोकांमध्ये ट्रुडोंच्या वक्तव्याचा राग आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ट्रुडोंचा आरोप हास्यास्पद आहे. वर्षभरात कॅनडामध्ये भारतविरोधी १५ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये ९ सभा, खलिस्तानच्या समर्थनात २ सार्वमत आणि ४ मंदिरांवरील हल्ल्यांच्या घटनांचा समावेश आहे. ट्रुडो सरकारने एकाही प्रकरणात कुणालाही अटक केली नाही. ब्रॅम्पटनच्या अक्षय गर्ग यांचे म्हणणे आहे की, ट्रुडो यांनी भारतावर आरोप केला, पण स्वत:च्या सरकारची कामे पाहिली नाहीत. इटोबिकोकमधील अश्विनी शर्मा म्हणाल्या, येथे भारताच्या विरोधात घडलेल्या घटनांचे व्हिडिओ पोलिसांना सोपवले जातात, पण पोलिसांना एकही आरोपी सापडत नाही. Indians resent Canada’s Trudeau government, 15 anti-Indian incidents in year; No one is even arrested
आता खलिस्तानी निज्जरच्या हत्येच्या तीन महिन्यांतच कॅनडाला मोठे पुरावे मिळाले आहेत… हे कसे शक्य आहे? ओंटारियोचा शिख युवक बलजीतचे (नाव बदलले) म्हणणे आहे की, काही लोकांमुळे संपूर्ण समाजाचा अपमान होतो. येथील ट्रूडो सरकार मूग गिळून गप्प आहे.
“ट्रुडो कमकुवत नेते, ते खलिस्तान्यांना खुश करत आपली गादी वाचवत आहेत’
ट्रुडोंनी असे वक्तव्य का केले?
पीएम ट्रुडो कमकुवत नेते आहेत. त्यांची पॉपुलॅरिटी रेटिंग केवळ ३०% आहे. खलिस्तान समर्थक जगमीत धालीवाल यांच्या पक्षाच्या समर्थनाखाली ते सरकार चालवत आहेत. खलिस्तानींना खुश करत आपली गादी वाचवत आहेत.
पाश्चात्त्य देशांची भूमिका काय?
ब्रिटन, यूएस, ऑस्ट्रेलियाने प्राथमिक प्रतिक्रिया दिली. यातून ट्रुडोंना काहीच मिळणार नाही. यामुळे भारताच्या संबंधांवर कोणताच परिणाम होणार नाही.
कॅनडात भारताचा विरोध का आहे?
यास कॅनडाचे पीएम ट्रुडो हेच जबाबदार आहेत. त्यांनी ८० च्या दशकात बब्बर खालसाला आश्रय दिला. कनिष्क विमानाचा स्फोट घडवला. आता जस्टिनही वडिलांचे धोरण पुढे नेत आहेत.
संबंधांवर परिणाम होईल?
सध्या व्यापार-वाहतुकीवर परिणाम होणार नाही. मात्र, ट्रुडोंना भारताने दिलेल्या १८ मोस्ट वाँटेडना पकडावे लागेल. कॅनडाने तूर्तास मुक्त व्यापार चर्चा थांबवली आहे, पण ती सुरू करावी लागेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App