भारतीय हवाई दलास लवकरच मिळणार १२ नवीन स्वदेशी ‘Su-30MKI’ विमाने!

संरक्षण मंत्रालयाने या प्रोजेक्टसाठी तब्बल ११ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने आज भारतीय लष्करासाठी स्वदेशी बनावटीची विमाने खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. जे देशात तयार होतील. एएनआयच्या वृत्तानुसार, संरक्षण मंत्रालयाने आज भारतीय हवाई दलासाठी १२ ‘Su-30MKI’ खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, जी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे भारतात निर्माण केली जातील. प्राप्त  माहितीनुसार, संरक्षण मंत्रालयाने या प्रोजेक्टसाठी तब्बल ११ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. Indian Air Force will soon get 12 new indigenous Su 30MKI aircraft

या प्रकल्पात विमाने आणि संबंधित ग्राउंड सिस्टमचा समावेश असेल. विमानात आवश्यकतेनुसार ६० टक्क्यांहून अधिक देशी सामग्रीचा समावेश असेल.  ही भारतीय वायुसेनेची सर्वात आधुनिक Su-30 MKI विमानं असतील, जी अनेक भारतीय शस्त्रे आणि सेन्सर्सने सुसज्ज असतील.

नुकतीच १५ सप्टेंबर रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. या बैठकीत, संरक्षण संपादन परिषद (DAC) ने अंदाजे ४५ हजार कोटी रुपयांच्या  प्रस्तावांना आवश्यकतेनुसारची मान्यता  दिली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की या सर्व खरेदी भारतीय विक्रेत्यांकडून केल्या जातील, ज्यामुळे भारतीय संरक्षण उद्योगाला ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने प्रोत्साहन मिळेल.

Indian Air Force will soon get 12 new indigenous Su 30MKI aircraft

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात