असा चमत्कार 1977 नंतर पहिल्यांदाच घडला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Australia जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पर्थमध्ये इतिहास रचला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा पराभव करून टीम इंडियाने नवा विक्रम रचला आहे. पहिल्या डावात 150 धावा करणाऱ्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात अवघ्या 104 धावांत गुंडाळले होते.Australia
यानंतर टीम इंडियाने आपला दुसरा डाव 487/6 धावांवर घोषित केला आणि ऑस्ट्रेलियासमोर 534 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. या डोंगरासारख्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावात अवघ्या 238 धावांवर गडगडला. अशाप्रकारे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्याच्याच घरात 295 धावांनी पराभूत करून मोठा इतिहास रचला.
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर धावांच्या बाबतीत भारतीय संघाचा हा सर्वात मोठा कसोटी विजय आहे. याआधी टीम इंडियाने 1977 मध्ये मेलबर्नमध्ये खेळवण्यात आलेला कसोटी सामना 222 धावांनी जिंकला होता. आता टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरातील सर्वात मोठ्या पराभवाचा धक्का दिला आहे. इतकेच नाही तर भारताने WACA म्हणजेच पर्थमध्ये सर्वात मोठ्या कसोटी विजयाचा विक्रम केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App