President Ram Nath Kovind Speech : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देशवासीयांना संबोधन; कोरोना, कृषी, नवे संसद भवन, जम्मू-कश्मीरसह या मुद्द्यांचा उल्लेख

india independence day 2021 president ram nath kovind speech on eve of india 75th independence day

President Ram Nath Kovind Speech : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना संबोधित केल. त्यांनी कोरोना महामारीचा उल्लेख करत म्हटले की, सध्या महामारीची तीव्रता कमी झालेली आहे, परंतु कोरोनाचा प्रभाव अद्याप संपलेला नाही. प्रत्येक जोखीम पत्करून आमचे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, प्रशासक आणि इतर कोरोना योद्धांच्या प्रयत्नांमुळेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. ते म्हणाले की, आपल्या शास्त्रज्ञांनीही कमी वेळेत कोरोनावरील लस तयार केली. india independence day 2021 president ram nath kovind speech on eve of india 75th independence day


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना संबोधित केल. त्यांनी कोरोना महामारीचा उल्लेख करत म्हटले की, सध्या महामारीची तीव्रता कमी झालेली आहे, परंतु कोरोनाचा प्रभाव अद्याप संपलेला नाही. प्रत्येक जोखीम पत्करून आमचे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, प्रशासक आणि इतर कोरोना योद्धांच्या प्रयत्नांमुळेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. ते म्हणाले की, आपल्या शास्त्रज्ञांनीही कमी वेळेत कोरोनावरील लस तयार केली.

लवकर लस घेण्याचे आवाहन

राष्ट्रपती म्हणाले, “मी सर्व देशवासीयांना विनंती करतो की, प्रोटोकॉलनुसार लस लवकरात लवकर घ्यावी आणि इतरांनाही प्रेरित करावे. सध्या लस ही आपल्या सर्वांसाठी विज्ञानाने प्रदान केलेले सर्वोत्तम संरक्षण आहे. मी सर्व देशवासीयांना विनंती करतो की प्रोटोकॉलनुसार लस लवकरात लवकर घ्यावी. वैद्यकीय सुविधांच्या विस्तारासाठी एका वर्षाच्या कालावधीत 23,220 कोटी रुपये खर्च केले जात आहेत, हे समाधानकारक आहे.

कृषी क्षेत्रावर काय म्हणाले?

राष्ट्रपती पुढे म्हणाले, “मला आनंद आहे की सर्व अडचणी असूनही, ग्रामीण भागात विशेषत: शेती क्षेत्रात वाढ सुरू आहे. कृषी विपणनात केलेल्या अनेक सुधारणांमुळे आमचे अन्नदाता शेतकरी अधिक सशक्त होतील आणि त्यांना त्यांच्या उत्पादनांची चांगली किंमत मिळेल.”

जम्मू-काश्मीरच्या तरुणांसाठी..

आपल्या भाषणात राष्ट्रपती म्हणाले, “मी जम्मू -काश्मीरमधील रहिवाशांना, विशेषत: तरुणांना, या संधीचा लाभ घेण्याचे आणि लोकशाही संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या आकांक्षा साकार करण्यासाठी सक्रिय होण्याचो आवाहन करतो. आता जम्मू -काश्मीरमध्ये एक नवीन प्रबोधन दिसत आहे. सरकारने लोकशाही आणि कायद्याच्या राज्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांशी सल्लामसलत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.”

संसदेच्या नवीन इमारतीबद्दल

राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, “आपली लोकशाही संसदीय प्रणालीवर आधारित आहे, म्हणून संसद हे आपल्या लोकशाहीचे मंदिर आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त या नवीन इमारतीचे उद्घाटन हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या विकास प्रवासाचा ऐतिहासिक प्रारंभ मानला जाईल. आपली लोकशाही संसदीय पद्धतीवर आधारित आहे, म्हणून संसद हे आपल्या लोकशाहीचे मंदिर आहे. आपल्या लोकशाहीचे हे मंदिर नजीकच्या भविष्यात एका नवीन इमारतीत स्थापन होणार आहे, ही सर्व देशवासीयांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला ते म्हणाले, “देश-विदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे. या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाला विशेष महत्त्व आहे, कारण या वर्षीपासून आपण सगळे आपल्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापनदिनानिमित्त आझादीचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत.

कोरोना योद्ध्यांचे कौतुक

राष्ट्रपती असेही म्हणाले की, “कोरोना संकटाच्या काळात लाखो लोकांनी स्वतःची पर्वा न करता नि:स्वार्थपणे मानवतेच्या दिशेने इतरांच्या आरोग्याचे आणि जीवनाचे रक्षण करण्यासाठी प्रचंड जोखीम घेतली. अशा सर्व कोविड योद्ध्यांचे मी मनापासून कौतुक करतो. अनेक कोविड योद्ध्यांनी आपले प्राणदेखील गमावले आहेत. मी त्या सर्वांच्या स्मृतीस नमन करतो.”

राष्ट्रपती म्हणाले, “स्वातंत्र्याचे आमचे स्वप्न ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या अनेक पिढ्यांच्या संघर्षातून साकार झाले. त्या सर्वांनी त्याग आणि बलिदानाची अनोखी उदाहरणे सादर केली. त्या सर्व अमर सेनानींच्या पवित्र स्मृतीला मी आदराने नमन करतो.

ऑलिम्पिक खेळांसंदर्भात ते म्हणाले, “आमच्या खेळाडूंनी नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीने देशाचे नाव उंचावले आहे. मी प्रत्येक पालकांना विनंती करतो की, कर्तृत्ववान मुलींच्या कुटुंबांकडून प्रेरणा घ्या आणि आपल्या मुलींना पुढे जाण्याची संधी द्या.”

india independence day 2021 president ram nath kovind speech on eve of india 75th independence day

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात