विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नीरज चोप्राने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. नीरजने एकीकडे इतिहास रचला आणि दुसरीकडे भारतात उत्सवाचे वातावरण तयार झाले , का नाही, शेवटी पहिले सुवर्ण पदक भारताला मिळाले . पण तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा नीरज चोप्रा ने सुवर्ण जिंकले, तेव्हा जर्मनीतील एका छोट्या गावातही उत्सवासारखे वातावरण होते. आता तुम्ही विचार करत असाल की नीरजचे हे जर्मनी कनेक्शन काय आहे? चला तर जानून घेऊया हे खास निरज जर्मनी कनेक्शन …..India to Germany: How did Neeraj, who looks like a hero, get a medal? India to Tokyo-Tokyo to Germany live discussion! Why is Niraj’s victory being celebrated in Germany?
तो परतला त्या दिवसापासून त्याच्या सन्मानार्थ विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. नीरजच्या या यशाचा उत्सव फक्त भारतापुरता मर्यादित नाही, तर त्याचा प्रभाव जर्मनीत असलेल्या एका छोट्या गावापर्यंत पोहोचला आहे.
नीरज चोप्राने 7 ऑगस्ट रोजी टोकियोमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि संपूर्ण देशाचा निरज नायक बनला.
डॉ. क्लॉस बार्टोनिट्झच्या गावात उत्सव –
निरजचे प्रशिक्षक डॉ.क्लॉस बार्टोनिट्झ यांनी नीरजच्या यशात महत्वाची भूमिका बजावली आहे. ऑलिम्पिकनंतर, जेव्हा क्लाॅस जर्मनीत त्याच्या गावी पोहोचले, तेव्हा त्याला आश्चर्य वाटले की नीरजचा विजय तेथे देखील साजरा केला जात आहे. क्लाॅसचे हे छोटे गाव पूर्व जर्मनीतील जंगलांनी वेढलेले आहे. क्लाॅस आता येथील लोकांसाठी एक सेलिब्रिटी बनले आहेत. संपूर्ण गावाने नीरजचा कार्यक्रम टीव्हीवर पाहिला आणि त्याचा चाहता झाला. बऱ्याच लोकांनी क्लॉसला फोन करून त्याचे अभिनंदनही केले.
निरजचे प्रशिक्षक डॉ.क्लॉस बार्टोनिट्झ म्हणतात-
माझ्या गावातील लोक सरळ लोक आहेत, खेळांशी संबंधित नाहीत. असे असूनही ते नीरजच्या कामगिरीने प्रभावित झाले . मला अनेकांचे फोन आले जे चित्रपट अभिनेत्या सारख्या दिसणाऱ्या या खेळाडूने हा इतिहास कसा घडवला हे जाणून घेण्यास उत्सुक होते.
नीरज चोप्राच्या ऑलिम्पिक विजयानंतर आता जितके फोन येत आहेत तितके मले कधीही आले नाहीत.असेही त्यांनी सांगीतले .
मुख्य प्रशिक्षक उवे होन यांचेही भव्य स्वागत-
निरजचे मुख्य प्रशिक्षक, उवे होन, जे जर्मनीचे आहेत, त्यांचे देखील राईनसबर्ग या गावीही असेच भव्य स्वागत झाले. 8000 रहिवासी या शहरात राहतात .नीरज चोप्राचा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणे हा शहराचा चर्चेचा विषय बनला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App