नाशिकमध्ये ध्वज संहिता धुडकावून दुकानदारांने विक्रीस ठेवले भारतीय तिरंगा ध्वज; पोलीसांच्या धडक कारवाईत ध्वज जप्त


प्रतिनिधी

नाशिक – भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज नाशिक शहरातील भद्रकाली परिसरात फ्रूट मार्केटमधील दुकानांमध्ये भारतीय राष्ट्रीय तिरंगा ध्वज नियम आणि ध्वजसंहिता धुडकावून उलटे लावण्यात आले होते. हे ध्वज विक्रीसाठी ठेवले होते. breach of national flag code in nashik, police took strigent action in bhadrakali area

मात्र, परिसरातील जागरूक कार्यकर्ते रमेश मानकर यांनी भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार करताच पोलीसांनी त्वरीत दखल घेऊन संबंधित दुकानांमधून ते ध्वज जप्त केले आणि दुकानदारावर कायदेशीर कारवाई केली.



भारतीय राष्ट्रध्वजाचे कापड खादीचे, सुती किंवा रेशमी असले पाहिजे असे ध्वज संहिता सांगते. परंतु, संबंधित दुकानदाराने सुती, खादी किंवा रेशमी कापड सोडून नायलॉन , सॅटिन कापडात बनवलेले राष्ट्रध्वज विक्रीसाठी ठेवले होते. हा ध्वज संहितेचा भंग होता.

त्यामुळे रमेश मानकर यांनी त्याबद्दल तक्रार केली. या तक्रारीची त्वरित दखल घेऊन भद्रकाली पोलिसांनी संबंधित दुकानदारावर कारवाई केली आणि सर्व ध्वज जप्त केले.

breach of national flag code in nashik, police took strigent action in bhadrakali area

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात