Breast Cancer : अभिमानास्पद ! नाशिकच्या कंपनीचं महत्त्वपूर्ण ‘ईझी चेक’ संशोधन ! ब्रेस्ट कॅन्सरचं होणार लवकर निदान


  • स्तनांच्या कर्करोगाचं ( Breast Cancer) प्राथमिक अवस्थेतच निदान होऊ शकेल, अशी रक्तचाचणी भारतीय कंपनीनं विकसित केली आहे.Important ‘Easy Check’ research of Nashik company
  • अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं या संशोधनाला मान्यता दिली आहे. त्यानुसार लवकरच ईझी चेक नावानं अत्यंत वाजवी दरात ही रक्त तपासणी महिलांसाठी उपलब्ध होणार आहे.

विशेष प्रतिनिधी

नाशिक: स्तनांच्या कर्करोगाचं (Breast Cancer) प्राथमिक अवस्थेतच निदान होऊ शकेल, अशी रक्तचाचणी नाशिकच्या दातार जेनेटिक्स कंपनीने विकसित केली आहे. विशेष म्हणजे भारतीय कंपनीच्या या संशोधनाला अमेरिकन एफडीएचं पेटंट मिळालं आहे.  कंपनीने जाहीर केल्यानुसार त्यांना अमेरिकेच्य फूड अ‍ॅन्ड ड्र्ग्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशन कडून ‘Breakthrough Designation’जारी करण्यात आले आहे.

हे सुरूवातीच्या टप्प्यातील ब्रेस्ट कॅन्सर च्या निदानासाठी ब्लड टेस्ट साठी आहे. या रक्ताच्या चाचणी मध्ये दातार कॅन्सर जेनेटिक्स कडून खास तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे. याद्वारा ट्युमर सेल्सचं आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या क्लस्टर स्पेसिफिकचं निदान करता येते.


कोरोनामुळे उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था नेस्तनाबूत.. देश कठिण परिस्थितीत असल्याची किम जोंगची कबुली


 

क्लिनिकल ट्रायल्सच्या डाटानुसार, स्टेज 0 ते स्टेज 1 मधील ब्रेस्ट कॅन्सरचं यामध्ये निदान केलं जाऊ शकतं. त्याचा 99% अ‍ॅक्युरसी रेट आहे. सुमारे 20 हजार निरोगी आणि कॅन्सर पिडीत महिलांवर ही चाचणी करण्यात आली आहे. या चाचणी करिता केवळ 5 मिली रक्त आवश्यक आहे.

या व्यतिरिक्त कोणतेही रेडिएशन किंवा मॅमोग्राफीची गरज नाही.  भारतामध्ये 1.7 लाख पेक्षा अधिक महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचे निदान होते. यामध्ये ते 3 आणि 4 टप्प्यामध्ये कॅन्सर लक्षात येतो. त्यामुळे उपचार देखील महाग, त्रासदायक आणि रूग्ण बचावण्याची शक्यता कमी होते. जर ब्रेस्ट कॅन्सर लवकर समजला तर तो 99% बरा होण्याची शक्यता आहे.

आता पहिल्यांदा चाळीशी पार महिला ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानासाठी रक्त चाचणी करू शकणार आहेत. सध्या युरोपामध्ये ही टेस्ट उपलब्ध आहे तर भारतामध्येही लवकरच ‘EasyCheck’अंतर्गत आवाक्यात उपलब्ध केली जाणार आहे. कंपनीकडून हेल्थ केअर प्रोव्हाईडर्स सोबत त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

अमेरिकेत ट्रायनेत्रा ब्रेस्ट किंवा युरोप आणि यूकेमध्ये ट्रु चेक ब्रेस्ट या नावानं सध्या ब्रेस्ट कॅन्सर निदान करणारी चाचणी केली जाते. आता लवकरच भारतातही ईझी चेक नावानं ही चाचणी उपलब्ध होणार आहे. वेळीच निदान झाल्यानं आता भारतीय महिलांना देखील स्तनांच्या कर्करोगावर सहज मात करणं शक्य होणारा

Important ‘Easy Check’ research of Nashik company

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात