कोरोनामुळे उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था नेस्तनाबूत.. देश कठिण परिस्थितीत असल्याची किम जोंगची कबुली


विशेष प्रतिनिधी 

प्योंगयांग – उत्तर कोरिया सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असल्याचे या देशाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी आज सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या बैठकीत मान्य केले. पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधताना किम यांनी देशासमोरी परिस्थिती स्पष्ट केली. North Korea is in tricky situation

कोरोना संसर्गामुळे जगभरात लॉकडाउन असल्याने उत्तर कोरियाला व्यापारात मोठा फटका बसला आहे. अव्यवस्थापन आणि अमेरिकेने घातलेले कडक निर्बंध यामुळे आधीच डबघाईला आलेली या देशाची अर्थव्यवस्था आणखीनच कोलमडून पडली आहे.



 

कार्यकर्त्यांशी बोलताना किम म्हणाले की,‘‘आपण सध्या अत्यंत कठीण काळातून जात असूनही लोकांचे राहणीमान सुधारले आहे. देशासमोर असलेल्या अनेक आव्हानांवर आपल्याला मात करायची आहे. अमेरिकेविरोधात अणु कार्यक्रम सुरु ठेवण्याचा निर्णय कायम असून त्यासाठी जनतेने साथ द्यावी.’’

देशात कोरोना संसर्ग झालेला एकही रुग्ण नसल्याचा अहवाल उत्तर कोरियाने जागतिक आरोग्य संघटनेकडे पाठविला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते असाच अहवाल पाठवत आहेत..

North Korea is in tricky situation


इतर बातम्या वाचा…

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात