मुंबईसह राज्यभरात रेमडेसिव्हिरचा तुटवडा, अनेक ठिकाणी काळाबाजार

विशेष प्रतिनिधी 

मुंबई – कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी सर्वांत प्रभावी ठरलेली आणि सरकारकडून मान्यता दिलेल्या महत्त्वाच्या औषधांमधील एक असलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मुंबई, ठाण्यासह राज्यभरात तुटवडा निर्माण झाला आहे. या इंजेक्शनसाठी कोरोनारुग्णांच्या नातेवाईकांची फरपट होत आहे. Shortage of remidisevir in Maharashtra

सध्याची परिस्थिती गेल्या वर्षीच्या मे-जूनएवढीच वाईट झाली आहे. अनेक रुग्णालयातून रेमडेसिव्हिरची मागणी वाढल्याने उपलब्ध साठा संपत चालला आहे. दिलासादायक बाब म्हणजे पालिका तसेच शासकीय रुग्णालयात काही प्रमाणात साठा उपलब्ध झाली आहे. 

सरकारी व पालिकेच्या रुग्णालयांनी मे-जून महिन्यांमध्ये रेमडेसिव्हिरची मागणी केल्यामुळे सध्या त्यांच्याकडे काही प्रमाणात साठा उपलब्ध आहे; परंतु तुलनेने खासगी रुग्णालयांमध्ये तुटवडा जाणवत आहे. औषध कंपन्यांनी मध्यंतरी पुरवठा सुरळीत केल्यानंतर सरकारी रुग्णालयांमध्ये औषधे उपलब्ध झाली होती. त्यानंतर मार्च महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने राज्यात रेमडेसिव्हिरचा तुटवडा जाणवत आहे.

Shortage of remidisevir in Maharashtra


इतर बातम्या वाचा…

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*