ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना राष्ट्रपतींच्या हस्ते वीरचक्र प्रदान


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हवाई दलाने याच महिन्यात वर्धमान यांना ग्रुप कॅप्टनचा दर्जा दिला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र प्रदान केला. Capt. Abhinandan felicitated with veer Chakra

अभिनंदन यांनी वैयक्तिक सुरक्षेकडे दुर्लक्ष करत शत्रूचा सामना करताना कर्तव्याच्या अपवादात्मक भावनेतून विलक्षण धैर्य दाखविले, असे ट्विट राष्ट्रपती भवनाने केले.राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर मान्यवर, वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते.



भारताने बालाकोटमध्ये हवाई हल्ले केल्यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर दिले होते. यावेळी, अभिनंदन यांनी २७ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांच्या मिग २१ विमानाला धडकण्यापूर्वी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ १६ विमान पाडले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या ताब्यात सापडूनही त्यांनी परिस्थितीचा धैर्याने सामना केला. त्यांचे पाकिस्तानने १ मार्च २०१९ रोजी भारतात प्रत्यार्पण केले होते.

Capt. Abhinandan felicitated with veer Chakra

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात