लाचखोरी करून लोकसभेत प्रश्न विचारणाऱ्या तृणमूळ काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची खासदारकी अखेर रद्द झाली. लोकसभेच्या एथिक्स कमिटीने विविध पुराव्यांच्या आधारे महुआ मोईत्रांना दोषी ठरविले आणि लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार लोकसभेने बहुमताने त्यांची खासदारकी रद्द केली. अदानींच्या विरुद्ध हे प्रकरण पेटवले होते, ते महुआ मोईत्रांच्या खासदारकी रद्द होण्यापर्यंत येऊन ठेपले. त्यामुळे महुआंचे संसद बाह्य राजकारण सुरू झाले. सोनिया गांधींना पाठीशी उभे करून महुआ मोईत्रांनी मोदी सरकारवर संसदेबाहेर आगपाखड करून घेतली. If mamata says, today bypass surgery happened to democracy, then does she accepts Modi government saved it??
त्यात तृणमूळ काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी उडी घेतली आणि महुआंच्या खासदारकी रद्द होण्यावरून, “आज लोकशाहीची बायपास झाली सर्जरी झाली”, असे वक्तव्य केले. महुआंविरुद्ध लोकसभेच्या एथिक्स कमिटीने 495 पानांचा अहवाल दिला. लोकसभा अध्यक्षांनी त्या अहवालावर बोलण्यासाठी अर्धा तास दिला. महुआ मोईत्रांना बाजू मांडण्याची देखील संधी दिली नाही. 495 पानांचा अहवाल एवढ्या कमी वेळात कोण आणि कसे वाचू शकेल??, याचे भानही अध्यक्षांनी ठेवले नाही. पण “इंडिया” आघाडीचे सर्व खासदार महुआंच्या बाजूने उभे राहिले. महुआ त्यांची पुढची लढाई लढतीलच. आम्ही सर्वजण मिळून “इंडिया” आघाडी म्हणून भाजप विरुद्ध लढाई लढू, अशी संतप्त प्रतिक्रिया ममता बॅनर्जी व्यक्त केली.
पण यात ममतांनी, “आज लोकशाहीची बायपास सर्जरी झाली”, हे जे वक्तव्य केले, यातून त्यांना “बायपास सर्जरी” या शब्दाचा नेमका अर्थ तरी कळतो का??, असा सवाल तयार झाला.
कारण बायपास सर्जरी म्हणजे हृदयविकाराचा झटका आलेल्या पेशंटला जीवदान देण्याची सर्जरी आहे. त्याच्या ब्लॉग झालेल्या रक्तवाहिन्यांना टाळून नव्या रक्तवाहिन्या जोडत त्याच्या हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत करणारी ही शस्त्रक्रिया आहे. याचा अर्थ बायपास सर्जरी नंतर पेशंट वाचतो, तो मरत नाही!!
मग ममता बॅनर्जींना, “आज लोकशाहीची “बायपास सर्जरी” झाली”, या वक्तव्यातून भारतातली लोकशाही वाचली, असेच म्हणायचे आहे का??… आणि तसे जर खरे असेल, तर ही देशाच्या लोकशाहीसाठी चांगलीच गोष्ट घडली ना!!… तसेही देशात मोदी सरकार आल्यापासून काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित “इंडिया” आघाडीच्या घटक पक्षांचे नेते भारतातली “लोकशाही मेली”, असल्याचीच छाती बडवत असतात. पण आता ममता बॅनर्जींनी “लोकशाहीची बायपास सर्जरी झाली”, असे म्हणून त्या लोकशाहीला मोदी सरकारने नवे जीवन दिल्याचीच कबुली देत आहेत. ही कबुली “इंडिया” आघाडीतल्या काँग्रेससह इतर घटक पक्षांना मान्य आहे का??, असा सवाल विचारण्याचीही वेळ ममतांनी आणली आहे.
वास्तविक ममता बॅनर्जी या सुशिक्षित आणि सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमधल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. त्या स्वतः सुविद्य आहेत. आपण काय बोलतो?? कसे बोलतो आणि कुठे बोलतो??, याचे सर्वसाधारण भान त्यांना असते. राहुल गांधींसारखे त्या “फम्बल” मारत नाहीत. त्या अनेकदा आक्रस्ताळी वक्तव्ये करतात, पण त्या क्वचितच “पॉलिटिकल इन्करेक्ट” बोलून फसतात.
ममतांचे आजचे, “आज लोकशाहीची बायपास सर्जरी झाली” हे वक्तव्य असेच “पॉलिटिकल इनकरेक्ट” अशा बोलून फसण्याच्या कॅटेगिरीत मोडते. कारण त्यांच्याच म्हणण्यानुसार, लोकशाहीची जर आज “बायपास सर्जरी” झाली असेल, तर लोकशाही वाचली आणि ती मोदी सरकारने वाचवली हे मान्य करावे लागेल!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App