रणबीर कपूरने स्वतःचाच विक्रम मोडला! ‘Animal’ ठरला कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट!

  • जाणून घ्या अवघ्या आठवडाभरात किती जमवला गल्ला

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. रिलीज झाल्यापासून हा चित्रपट एकापाठोपाठ एक रेकॉर्ड बनवत आहे आणि कमाईच्या बाबतीत इतिहास रचत आहे.Ranbir Kapoor broke his own record Animal became the highest grossing film of the career

चित्रपट प्रदर्शित होऊन 8 दिवस झाले असून हा चित्रपट रणबीर कपूरच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरत असल्याचे दिसत आहे. त्याच्या 8 दिवसांच्या कलेक्शनसह, ‘Animal’ हा रणबीर कपूरचा देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.



‘Animal’ दररोज करोडोंचा व्यवसाय करत आहे. या चित्रपटाची टक्कर विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’शी आहे, पण असे असूनही चित्रपट दररोज कोटींची कमाई करत आहे. सकनिल्‍कच्‍या अहवालानुसार, सातव्‍या दिवशीच्‍या कमाईसह चित्रपटाचे एकूण कलेक्‍शन 338.45 कोटी झाले आहे.

आता आठव्या दिवसाच्या सुरुवातीच्या अहवालानुसार, या चित्रपटाने आतापर्यंत 5.87 कोटींची कमाई केली आहे आणि यासोबतच ‘Animal’ चे एकूण कलेक्शन 344.32 कोटी रुपये झाले आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 344 कोटींची कमाई करून ‘एनिमल’ने रणबीर कपूरच्याच ब्लॉकबस्टर चित्रपट ‘संजू’ला मागे टाकले आहे. 342.57 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह ‘संजू’ हा रणबीर कपूरच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. मात्र आता ‘अॅनिमल’ने ‘संजू’ला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे

Ranbir Kapoor broke his own record Animal became the highest grossing film of the career

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात