हिंमत असेल, तर सनातन धर्माविरुद्ध तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवून दाखवा; DMK वर जबरदस्त प्रहार


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : सनातन धर्म म्हणजे मलेरिया डेंगी आणि कोरोना म्हणून त्या धर्माला उघडायला निघालेल्या DMK तामिळनाडूतूनच जबरदस्त प्रहार झाला आहे. भाजपचे लढवय्ये प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी सत्ताधारी DMK ला आगामी तामिळनाडूची विधानसभा निवडणूक सनातन धर्म विरुद्ध सनातनला उखडणारे अशी लढाई करण्याचे आव्हान दिले आहे. Going forward, we are sure that people will associate these deadly diseases with DMK.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केल्यानंतर अण्णामलाई यांनी एक व्हिडिओ जारी करत स्टालिन यांना यांच्यावर जबरदस्त प्रहार केले आहेत. त्यांनी तामिळनाडूचा सनातन धर्म आणि सुधारणा यांचा इतिहासच सविस्तरपणे सांगितला आहे. तामिळनाडूच्या इतिहासात सनातन धर्मियांनीच सुधारणांची मुहूर्तमेढ रोवली, याची असंख्य उदाहरणे त्यांनी नावांसह दिली आणि त्याचवेळी हिंमत असेल, तर तुम्ही तामिळनाडू विधानसभेची पुढची निवडणूक सनातन धर्म विरुद्ध सनातनला उखडणारे अशी करून दाखवा, असे आव्हान दिले.

त्याचवेळी त्यांनी द्रविड मुन्नेत्र कळघमचा सामाजिक भेदभाव करण्याचा इतिहासच बाहेर काढला. 1923 पासून ते 2023 पर्यंत तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात द्रविड मुन्नेत्र कळघमने दलित समाजातल्या नेत्यांना कायमच दुय्यम वागणूक दिली. मंत्र्यांना घरी बसवले. याची उदाहरणे दिली प्रख्यात दलित लीडर एमसी राजा यांनी 1923 मध्ये जस्टीस पार्टी सोडली. जी जस्टीस पार्टी ब्राह्मण वर्चस्ववादाच्या विरोधात लढत होती, त्या जस्टिस पार्टीमध्ये दलितांविरुद्ध भेदभाव केला जातो आणि बाकीच्याच जातींचे पुढारी दलितांवर वर्चस्व गाजवतात, असा आरोप राजा यांनी केला होता. 1974 मध्ये प्रख्यात दलित नेत्या सत्यवाणी मुथू यांनी एम. करुणानिधी यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. करुणानिधींनी आंबेडकरांच्या नावाने निघालेल्या महाविद्यालयाला सरकारी निधी द्यायला नकार दिल्याने त्याचा सत्यवाणी मुथू यांनी निषेध करत राजीनामा दिला होता, याची आठवण अण्णामलाई यांनी करून दिली.

त्या उलट सनातन धर्माचे पालन करणाऱ्या अनेक संतांनी समाज सुधारणेचा वसा तामिळनाडू या जनतेला दिला याची उदाहरणे अण्णामलाई यांनी दाखवून दिली. स्टालिन यांच्या मंत्रिमंडळात फक्त तीन दलित मंत्री आहेत. त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात दलित आणि पिछड्या वर्गाचे 21 मंत्री आहेत, हे त्यांनी आकडेवारीनिशी दाखवून दिले.

अण्णामलाई यांचा हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. तामिळनाडूतून सनातन धर्म नष्ट होणार नाही पण डेंगी, मलेरिया आणि कोशू या रूपातला DMK पक्ष मात्र निश्चितच नष्ट होईल, असा जबरदस्त प्रहार अण्णामलाई यांनी केला आहे.

एम. के. स्टालिन यांचे पुत्र उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माला मलेरिया, डेंगी आणि कोरोना असे संबोधन त्याच्या निर्मूलनाची उर्मट भाषा केली. उदयनिधीला 2 जी घोटाळ्यातला आरोपी ए. राजाची साथ मिळाली. खुद्द मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी उदयनिधीची पाठ राखण केली.

या पार्श्वभूमीवर अण्णामलाई यांनी स्टालिन पिता पुत्रांची चांगलीच धुलाई केली. तामिळनाडू तुम्ही निवडून आलात की तुम्ही अमर अकबर अँथनी होता. तुम्ही पहिल्या वर्षात सनातन धर्माच्या विरोधात बोलायला लागता. नंतर सनातन धर्माला उखडायची भाषा वापरता. नंतर तुम्ही धर्मनिरपेक्ष होता आणि शेवटच्या वर्षात तुम्ही पुन्हा हिंदू होता. DMK पक्षात 90% हिंदू असल्याची ग्वाही देता. पण असले अमर अकबर अँथनी प्रयोग राहुल गांधींनी 17 वेळा करून झाले आणि ते कोसळून पडले. तसाच तुमचाही अमर अकबर अँथनी प्रयोग तामिळनाडूत आगामी विधानसभा निवडणुकीत कोसळून पडेल, असा स्पष्ट इशारा अण्णामलाई यांनी दिला.

Going forward, we are sure that people will associate these deadly diseases with DMK.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात