नाशिक : भारतात सुरू होणाऱ्या g20 च्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आखलेल्या “अडथळा रणनीतीवर” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “नेहले पे देहला” असा मास्टर स्ट्रोक मारला आहे. पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्र्यांसाठी एक विशेष धोरणात्मक कार्यपद्धती आखून दिली आहे, ती म्हणजे सर्व मंत्र्यांनी g20 च्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतच राहावे. आपल्याला नेमून दिलेली कामे चोख करावीत, पण त्याच वेळी विरोधकांनी सनातन धर्मावर सुरू केलेल्या खोडसाळ टीकेला तिथल्या तिथे सडेतोड उत्तर द्यावे, अशा स्पष्ट सूचना पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना दिल्या आहेत. पण या सूचनांमध्ये त्यांनी अशा एका सूचनेचा अंतर्भाव केला आहे, ज्यामुळे देशातले विरोधक पूर्णपणे “एक्सपोज” झाले आहेत. ही सूचना म्हणजे, मोदींनी आपल्या मंत्र्यांना “इंडिया” की “भारत” या वादात सध्या बिलकुल पडू नका, ही होय!! Modi strategy : give befitting reply over criticism of sanatan dharma, but don’t plunge into India – bharat controversy
*पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या सूचनांचा नेमका अर्थ बारकाईने समजून घेण्याची गरज आहे आणि त्यासाठी थोडी पार्श्वभूमीही समजून घ्यावी लागेल. ती अशी : सनातन धर्मावर नेमकी आत्ताच टीका कशी काय सुरू झाली?? त्यातही त्याचे ओरिजिन तामिळनाडूतच कसे काय आढळते?? या प्रश्नांची उत्तरे नीट शोधली की त्यामागचे खरे राजकीय बिंग फुटेल.*
मूळात जी 20 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्षांचे आणि त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी अथवा त्यांच्या अन्य नातेवाईकांचे स्वागत करणार आहेत, त्यांना भारतीय परंपरांचे वेगवेगळ्या पातळ्यांवर दर्शन घडविणार आहेत. त्याचा सविस्तर तपशील जाहीर झाला आहे. जी 20 चे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान देशातल्या अशा ठिकाणांना भेटी देणार आहेत, जे सनातनशी पुरातन आणि ऐतिहासिक काळापासून जोडले गेले आहेत. त्यामध्ये काशी विश्वनाथ धाम, बुद्धगया वगैरे स्थानांचा समावेश आहे.
मुळातच g20 परिषद पंतप्रधान मोदींनी बिलकुलच “दिल्ली केंद्रित” ठेवलेली नाही. तिची व्याप्ती संपूर्ण भारतभराची ठेवली आहे. त्यामुळे देशभरातल्या किमान 50 शहरांमध्ये g20 संदर्भातल्या बैठका एकतर झाल्या आहेत किंवा होणार आहेत. त्यामुळे जी 20 परिषदेतल्या सर्व राष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना यानिमित्ताने भारत दर्शन होणार आहे आणि अर्थातच ते प्रामुख्याने सांस्कृतिक, धार्मिक आणि अध्यात्मिक अंगाने सनातन धर्माशी जोडलेले आहे. इथेच सनातन धर्मात वरच्या सध्याच्या टीकेचे राजकीय बिंग सापडते!!
आता g20 परिषदेला थेट विरोध करता येत नाही, त्याच्या यशस्वीतेत राजनैतिक पातळीवर खोडा घालता येत नाही, मग अशावेळी सॉफ्ट टार्गेट ठरू शकतो, तो सनातन धर्मच. त्यामुळे सनातन धर्माचे एक प्रमुख स्थान असलेल्या तामिळनाडूतून सुधारणा वादाच्या नावाखाली सनातन धर्माला टार्गेट करणे सुरू झाले आणि त्याला वेगवेगळे तथाकथित सुधारणावादी आयाम जोडले गेले. यामध्ये द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते सुरुवातीपासून आघाडीवर राहिले आणि त्याला आता राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांची जोड मिळाली.
हे सगळे “इंडिया” आघाडीतले नेते आहेत आणि इथे खरे सनातन धर्मावरच्या टीकेचे राजकीय इंगित जोडले गेले आहे. म्हणूनच पंतप्रधान मोदींनी सनातन धर्मावरच्या टीकेला चोख प्रत्युत्तर द्या, असे मंत्र्यांना जरूर सांगितले पण त्याचवेळी इंडिया की भारत या वादापासून दूर राहायला सांगितले.
कारण मूळातच इंडिया की भारत हा वाद कृत्रिम रित्या तयार केला गेला आहे. अधिकृत पातळीवर सरकारने त्या संदर्भात कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. जी 20 च्या पार्श्वभूमीवर तर कोणतेही सरकार इंडिया की भारत असा वाद स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी देखील घालणार नाही, मग अशावेळी राजनैतिक पातळीवर जे मोदी सरकार अधिक चलाख मानले जाते, ते सरकार इंडिया की भारत असा वाद g20 च्या पार्श्वभूमीवर समोर आणणे शक्यच नाही. त्यामुळे विरोधकांनी आणि माध्यमांनी तयार केलेल्या इंडिया की भारत या वादात मंत्र्यांनी बिलकुल पडू नये अशी सूचना पंतप्रधान मोदींनी केल्याचे दिसते.
त्यातून जी 20 च्या पार्श्वभूमीवर दोन गोष्टी साध्य होतील. पहिली म्हणजे भारताची सनातन संस्कृती आणि अध्यात्म बळकट असल्याचे वारंवार ठसविले जाईल आणि त्याच वेळी इंडिया की भारत या अनावश्यक वादाला सरकार बगल देऊ शकेल.
याचा सोप्या राजकीय भाषेत अर्थ असा की मोदी सरकार जी 20 च्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी लावलेल्या दुहेरी सापळ्यात अडकणार नाही. मोदींच्या स्ट्रॅटेजीतून एकाच वेळी सनातन धर्मावर केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर मिळेलच, पण त्याच वेळी इंडिया की भारत या अनावश्यक वादाच्या ट्रॅप मध्ये सरकार अडकणार नाही. हा खरा मोदींचा मास्टर स्ट्रोक आहे. याचे वेगवेगळे ध्वनी पुढच्या चार-पाच दिवसांत उमटणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App