”२०२४ची दहीहंडी मोदीच फोडतील” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास; आनंद दिघेंचंही केलं स्मरण, म्हणाले…


ठाण्यातील टेंभीनाक्याच्या मानाच्या दहीहंडी महोत्सवास आवर्जून लावली उपस्थिती

विशेष प्रतिनिधी

ठाणे : आज संपूर्ण देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. महाराष्ट्रातही जन्माष्टमीचा उत्साह शिगेला पोहचला आहे, सर्वच ठिकाणी गोविंदा पथकं दहीहंडी फोडत आहेत, तर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचे नेते मंडळी नागरिाकांना विविध पद्धतीने शुभेच्छा देत आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी मानाच्या दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांची चढाओढ लागली आहे. तर अनेक ठिकाण बॉलिवूड स्टारचीही हजेरी असल्याने तरुणाईचा आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. अशाच प्रकारे ठाण्यामधील टेंभीनाका येथील मानाच्या दहीहंडी महोत्सवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून गोविंदा  पथकांशी संवाद साधला. Chief Minister Eknath Shinde expressed his belief that Modi will break the Dahihandi of 2024

आनंद दिघे  यांच्या प्रेरणेतून स्थापन करण्यात आलेल्या टेंभीनाका मित्र मंडळाच्या दहीहंडी मित्र मंडळाने आयोजित केलेल्या दहीहंडी महोत्सवाला उपस्थित राहून गोविंदांशी मुख्यमंत्री शिंदे यांनी खास संवाद साधला. विशेष म्हणजे यावेळी बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रित सिंह आणि अभिनेता वाशु भगनानी हे देखील खास पाहुणे म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे  म्हणाले,  ठाणे  शहरात दहीहंडीचा सण मोठ्या प्रमाणात साजरे करायची सुरुवात धर्मवीर आनंद दिघे यांनी केली. त्यांच्याच प्रेरणेतून राज्य सरकारने यंदा प्रथमच प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करून दहीहंडीच्या खेळाला प्रतिष्ठा मिळवून दिली. गोविंदा या खेळाला शासकीय खेळाचा दर्जा दिला. राज्यातील १ लाख गोविंदाना १० लाख रुपयांचा विमा काढला, दहीहंडीच्या सणाला शासकीय सुट्टी जाहीर केली तसेच या खेळात जखमी झालेल्या गोविंदाना ५ लाख, गंभीर जखमींना साडे सात लाख आणि मृत्यू झाल्यास १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

तसेच राज्यातील महायुती सरकारने विकासकामांचे थर उभे करून एक भक्कम मनोरा रचला आहे. मोदी द्वेषातून कितीही ‘इंडी’ आघाड्या झाल्या तरीही जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभी असून २०२४ ची दहीहंडी मोदीच फोडतील असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला.

Chief Minister Eknath Shinde expressed his belief that Modi will break the Dahihandi of 2024

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात