राज ठाकरेंनी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दिल्या शुभेच्छा; दहीहंडीच्या उल्लेख करत म्हणाले…


खरंतर ही साजरी करण्यासाठी हिंदू बांधवांना कधी संघर्ष करावा लागेल असं वाटलंच नव्हतं. पण…

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आज संपूर्ण देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. महाराष्ट्रातही जन्माष्टमीचा उत्साह शिगेला पोहचला आहे, सर्वच ठिकाणी गोविंदा पथकं दहीहंडी फोडत आहेत, तर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचे नेते मंडळी नागरिाकांना विविध पद्धतीने शुभेच्छा देत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छ दिल्या आहेत. तसेच, दहीहंडी उत्सवाचा उल्लेख करत टिप्पणीही केली आहे. Raj Thackeray wishes on the occasion of Shri Krishna Janmashtami Mentioning dahi handi

मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणतात,  ”सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम जनतेला श्रीकृष्ण जन्माच्या शुभेच्छा. भारतीय परंपरेतल्या अनेक महापुरूषांच आपल्या मनावर शतकानुशतकं गारुड आहे, पण त्यातलं भगवान श्रीकृष्णांचे गारुड हे मात्र अतुलनीय आहे. ते देशाच्या सीमा ओलांडून कधीच निसटून गेलं आहे. आज जगभरात कृष्णभक्ती करणाऱ्यांचा पंथ प्रचंड मोठा आहे. भगवान श्रीकृष्णांच्या आयुष्यातील सगळे टप्पे हे उत्कटतेने भरलेले, पण तरीही ते कशातच अडकले नाहीत.”

याशिवाय ”जगातील सर्वोच्च तत्वज्ञान मांडलं, वेळेस योद्धा झाले, पण सत्ताधीश होण्याची महत्वकांक्षा नाही. द्वारकाधीश झाले पण सुदाम्याला विसरले नाहीत. धुरंधर राजकारण केलं पण कलासक्तता कधी सोडली नाही आणि वेळेस सगळ्याचा त्याग करून जंगलात तपश्चर्येला जाऊन बसले.” असंही राज ठाकरेंनी सांगितलं आहे.

याचबरोबर ”इतके कंगोरे असलेला महापुरुष जगाच्या इतिहासात सापडणार नाही आणि म्हणूनच जगाला श्रीकृष्णांची भुरळ पडली नसती तर आश्चर्य. ह्याच भगवान श्रीकृष्णांची जन्माष्टमी साजरी करण्यासाठी आपल्याकडे ‘दहीहंडीची’ परंपरा आहे. खरंतर ही साजरी करण्यासाठी हिंदू बांधवांना कधी संघर्ष करावा लागेल असं वाटलंच नव्हतं. पण ते काही वर्षांपूर्वी सुरु झालं. ह्या संघर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध सरकार अशी लढाई झाली. पण आम्ही निकराची लढाई केली. असो, हिंदू सणांसाठी आणि मराठी मनांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम उभी आहे आणि राहील. कृष्ण जन्म उत्साहाने साजरा होऊ दे आणि दहीहंडी हे जागतिक आकर्षण बनू दे ह्याच शुभेच्छा.”  असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Raj Thackeray wishes on the occasion of Shri Krishna Janmashtami Mentioning dahi handi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात