भारतीय अमेरिकन गीता गोपीनाथ या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक असतील. त्या जेफ्री ओकामोटो यांची जागा घेणार आहेत. गुरुवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून सांगण्यात आले की, ओकामोटो लवकरच आपले पद सोडतील, त्यानंतर गीता गोपीनाथ त्यांच्या जागी पदभार स्वीकारतील. त्या आतापर्यंत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून कार्यरत होत्या. Gita Gopinath Chief Economist Of International Monetary Fund Take On New Role As First Deputy Managing Director
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय अमेरिकन गीता गोपीनाथ या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक असतील. त्या जेफ्री ओकामोटो यांची जागा घेणार आहेत. गुरुवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून सांगण्यात आले की, ओकामोटो लवकरच आपले पद सोडतील, त्यानंतर गीता गोपीनाथ त्यांच्या जागी पदभार स्वीकारतील. त्या आतापर्यंत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून कार्यरत होत्या.
तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या गोपीनाथ जानेवारी २०२२ मध्ये हार्वर्ड विद्यापीठात शैक्षणिक कार्य पुन्हा सुरू करणार होत्या, परंतु त्यांना प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जिओग्राव्हिया म्हणाल्या, “गीता गोपीनाथ या पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ज्ञ होत्या, त्या त्यांच्या सेवा सुरू ठेवतील आणि आता प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करतील याचा आम्हाला आनंद आहे.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App