COVID ALERT : महाराष्ट्र सरकार सावध ! अफ्रिका-झिंबाब्वे- बोट्सवानामधून येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारची नियमावली…


विशेष प्रतिनिधी

मुंबई : दक्षिण अफ्रिका, झिंबाब्वे, आणि बोट्सवाना हे तीन देश हाय रिस्क या कॅटेगरीत टाकण्यात आले आहेत. या देशांमध्ये कोरोनाचा Omicron हा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून काही नियम लागू केले आहेत. भारत सरकारने जे नियम लागू केले आहेत त्याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारनेही हे नियम लागू केले आहेत. COVID ALERT: Maharashtra government beware! Government of Maharashtra rules for passengers coming from Africa-Zimbabwe-Botswana

High Risk Countries

  • High Risk Countries म्हणजेच दक्षिण अफ्रिका, झिंबाब्वे आणि बोट्सवाना या देशातून येणाऱ्या नागरिकांना High Risk प्रवासी समजलं जाणार आहे याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे या देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा म्हणजे ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव 
  • या देशांमधून जे नागरिक महाराष्ट्रात येणार आहेत त्यांच्या बाबत राज्यसरकारने विशेष खबरादारी घेण्यास सुरूवात केली आहे.
  • हाय रिस्क असलेल्या देशांमधून आलेल्या प्रवाशांना प्राधान्याने उतरवले जाऊ शकते. त्यांच्या तपासणी आणि पडताळणीसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर संबंधित विमानतळ व्यवस्थापन प्राधिकरणांद्वारे स्वतंत्र काउंटरची व्यवस्था केली जाईल.
  • संबंधित आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताबडतोब RTPCR चाचणी करावी लागेल. सातव्या दिवशी दुसरी RTPCR चाचणी घेऊन अनिवार्य 7 दिवसांचे संस्थात्मक अलगीकरण आवश्यक.
  • RTPCR चाचणीपैकी कोणतीही चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास, अशा “हाय रिस्क एअर पॅसेंजर” ला कोविड उपचार सुविधा असलेल्या रुग्णालयात हलवले जाईल.
  • सातव्या दिवसाच्या RTPCR चाचणीचा निकाल निगेटिव्ह आल्यास, अशा हाय रिस्क एअर पॅसेंजरला आणखी 7 दिवस होम क्वारंटाईन केलं जाईल.

डीसीपी इमिग्रेशन आणि एफआरआरओ

  • गेल्या १५ दिवसांत भेट दिलेल्या देशांचा तपशील जाहीर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी घोषणापत्राचा मसुदा तयार करतील.
  • मुंबई विमानतळ मागील १५ दिवसांतील प्रवासासंबंधी माहितीचा प्रोफॉर्मा सर्व विमान कंपन्यांना शेअर करेल आणि आगमन झाल्यावर इमिग्रेशनद्वारे तपासले जाईल.
  • प्रवाशाने चुकीची माहिती दिल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या संबंधित कलमांनुसार कारवाई केली जाईल.
  • देशांतर्गत विमान प्रवासाच्या बाबतीत, प्रवाशांना एकतर पूर्णपणे लसीकरण करावे लागेल किंवा बोर्डिंग करण्यापूर्वी 72 तासांच्या आत RTPCR चाचणी प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागेल.

COVID ALERT : Maharashtra government beware! Government of Maharashtra rules for passengers coming from Africa-Zimbabwe-Botswana

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात