अंजू बॉबी जॉर्ज यांना मिळाला अ‍ॅथलेटिक्स सर्वोत्कृष्ट महिला पुरस्कार ; लिंग समानतेसाठी सातत्याने पुढाकार घेतला


बुधवारी युरोपमधील मोनॅको शहरात झालेल्या आभासी पुरस्कार वितरण सोहळय़ात अंजू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. Anju Bobby George won the Athletics Best Female Award; Consistently took the lead for gender equality


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताच्या माजी लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्ज यांची जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेकडून ‘वुमन ऑफ द इयर’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.२०२१ या वर्षांतील सर्वोत्तम महिलेचा बहुमान त्यांना मिळाला आहे.बुधवारी युरोपमधील मोनॅको शहरात झालेल्या आभासी पुरस्कार वितरण सोहळय़ात अंजू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

अंजू बॉबी जॉर्ज यांनी युवा पिढीला घडवण्याबरोबरच लिंग समानतेसाठी सातत्याने पुढाकार घेतला.अंजू बॉबी जॉर्ज यांनी २००३ मध्ये झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. क्रीडा जगतात देशाचे नाव लौकिक मिळवणाऱ्या अंजू बॉबी जॉर्जला भारत सरकारने २००३ मध्ये अर्जुन पुरस्कार आणि २००४ मध्ये राजीव गांधी खेलरत्न तसेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.जागतिक स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या त्या अद्यापही भारताच्या एकमेव अ‍ॅथलेटिक्सपटू आहेत. अ‍ॅथलेटिक्ससाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महिलांचा ‘वुमन ऑफ द इयर’हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.

दरम्यान ‘जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेने मला या पुरस्कारासाठी पात्र समजल्याने मी त्यांचे आभार मानते. ज्या क्षेत्राने आपली ओळख निर्माण केली. त्यासाठी योगदान देण्याचा आनंद निराळाच आहे. माझ्या कार्याची दखल घेऊन अनेक युवा मुलींना प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद’, असे ट्वीट अंजू यांनी केले आहे.

Anju Bobby George won the Athletics Best Female Award; Consistently took the lead for gender equality

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण