राष्ट्रपतींच्या दौर्याला आमचा विरोध नाही, मात्र किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिकॉप्टर आम्ही उतरु देणार नाही, असा पवित्रा येथील शिवप्रेमींनी घेतला आहे. We will not allow the President’s helicopter to land on the Holi hill at Raigad; Shivpremi warns district administration
विशेष प्रतिनिधी
रायगड : राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या ६ डिसेंबर रोजी रायगड किल्ल्यावर येवून छत्रपती शिवाजीमहाराजांना अभिवादन करणार आहेत. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे हॅलिकॉप्टर रायगड किल्ल्यावर उतरवले जाणार आहे. दरम्यान राष्ट्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हेलिकॉप्टर किल्ले रायगडावर उतरवू नका अशी मागणी शिवप्रेमीनी जिल्हाप्रशासनाकडे केली आहे. तसेच राष्ट्रपतींच्या दौर्याला आमचा विरोध नाही, मात्र किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिकॉप्टर आम्ही उतरु देणार नाही, असा पवित्रा येथील शिवप्रेमींनी घेतला आहे.
पूर्वी रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिपॅड होते. तेथे हॅलिकॉप्टर उतरताना किंवा उड्डाण घेताना मोठ्या प्रमाणात धूळ, माती आणि केर-कचरा उडत असे.दरम्यान शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर मोठ्या प्रमाणावर माती व धुळ उडत असल्याचे लक्षात आल्यामुळे शिवप्रेमीनी १९९६ साली येथे उपोषण करून हा हॅलिपॅड येथून काढून टाकण्यात आला होता.
दरम्यान आता तब्बल २५ वर्षांनंतर पुन्हा राष्ट्रपतींकरीता पुन्हा रायगडावर हेलिपॅड बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे शिवप्रेमीनी हेलिपॅड बनवण्यास विरोध केल्याने तणाव निर्माण झाला आहे. शिवप्रेमींकडून राष्ट्पतींचे हेलिकॉप्टर माळावर उतरवण्याला कडाडून विरोध केला जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App