ना हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी!!; ओबीसी नेते जगदीश ठाकोर गुजरात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पक्षात तरुण नेतृत्वाला प्राधान्य देण्याचे ठरवले असताना त्यांनी मध्यंतरी कन्हैया कुमार आणि गुजरातचा फायरब्रँड विद्यार्थी नेता जिग्नेश मेवाणी यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला होता. त्यावेळी जिग्नेश मेवाणी यांच्याकडे गुजरात मध्ये महत्त्वाचे पद सोपवण्यात येईल, अशी अटकळ बांधली गेली होती. परंतु आता गुजरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी जुनेच काँग्रेस नेते जगदीश ठाकोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  Jagdish thakor to be PCC chief in Gujarat

त्यामुळे ना हार्दिक पटेल, ना जिग्नेश मेवाणी, तर जगदीश ठाकोर हे सध्या गुजरात काँग्रेस प्रदेश समितीचे अध्यक्ष बनले आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. गुजरात विधानसभेत वरिष्ठ आमदार मनसुखलाल राठवा यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.



गेल्या नऊ महिन्यांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेते पद रिक्त होते. अमित छावडा यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडल्यापासून ते पद मिळवण्यासाठी गुजरात काँग्रेसमध्ये विविध गट कार्यरत होते. त्यामध्ये तरुण नेतृत्व म्हणून पाटीदार नेता हार्दिक पटेल आणि ओबीसी नेता जिग्नेश मेवाणी यांचा स्पर्धा असल्याचे मानण्यात येत होते. परंतु या दोघांनाही बाजूला ठेवत काँग्रेस हायकमांडने काँग्रेसचे जुनेच नेते जगदीश ठाकोर यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. जगदीश ठाकूर हे पाटण विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. त्याचबरोबर त्यांनी 2009 ते 2014 लोकसभेत देखील प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गुजरात विधानसभेची निवडणूक काँग्रेस लढवणार आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये ही निवडणूक नियोजित आहे.

जिग्नेश मेवाणी यांना पद दिले नसले तरी जगदीश ठाकोर यांच्या रूपाने ओबीसी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देऊन गुजरातमध्ये काँग्रेसने आपली राजकीय भूमिका देखील स्पष्ट केली आहे. भूपेंद्र पटेल यांच्या रूपाने भाजपने नवीन मुख्यमंत्री नेमून पाटीदार समाजाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला असताना काँग्रेसने ओबीसी नेते जगदीश ठाकोर यांना प्रदेशाध्यक्षपदी नेमून आपली राजकीय वाट वेगळी असल्याचे सूचित केले आहे.

Jagdish thakor to be PCC chief in Gujarat

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात