विशेष प्रतिनिधी
बंगळुरू: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचे सोमवारी निधन झाले. 80 वर्षीय ऑस्कर फर्नांडिस बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना मंगळुरूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.Former Union Minister and senior Congress leader Oscar Fernandes passed away
या वर्षी जुलैमध्ये त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेपासून ते कोमात गेले होते. ऑस्कर फर्नांडिस हे गांधी कुटुंबाचे खूप जवळचे मानले जात होते. यूपीए सरकारमध्ये ते रस्ते वाहतूक मंत्रीही होते.
जुलै महिन्यात घरात योगा करत असताना ऑस्कर फर्नांडिस यांचा अपघात झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने मेंदूमध्ये रक्त जमा झाले होते. त्यांच्यावर एक सर्जरीही करण्यात आली होती.
फर्नांडिस यूपीए सरकारमध्ये केंद्रीय परिवहन मंत्री होते. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी राजीव गांधी यांचे संसदीय सचिव म्हणूनही काम पाहिलं होतं. ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष होते.
फर्नांडिस यांनी 1980मध्ये कर्नाटकाच्या उड्डपी मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले होते. त्यानंतर याच मतदारसंघातून त्यांनी 1984, 1989, 1991 आणि 1996 मध्ये विजय मिळवला होता. 1998मध्ये ते राज्यसभेवर गेले होते. 2004मध्ये पुन्हा त्यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App