राऊस अव्हेन्यू कोर्टाचा निकाल; १८ तारखेला शिक्षेवर चर्चा
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : MP Sajjan Kumar १९८४ च्या शीख विरोधी दंगली प्रकरणात दोन जणांच्या हत्येप्रकरणी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दोषी ठरवले. आता सज्जन कुमारच्या शिक्षेवर १८ फेब्रुवारी रोजी चर्चा होणार आहे MP Sajjan Kumar
हे प्रकरण १ नोव्हेंबर १९८४ रोजी सरस्वती विहार परिसरात झालेल्या वडील-मुलाच्या हत्येशी संबंधित आहे. येथे सरदार जसवंत सिंग आणि सरदार तरुण दीप सिंग या दोन शीखांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात, सज्जन कुमारवर जमावाचे नेतृत्व केल्याचा आरोप होता.
सज्जन कुमारच्या चिथावणीने वडील आणि मुलाला त्यांच्या घरात जिवंत जाळण्यात आले. जमावाने घराची तोडफोड, लूटमार केली आणि आग लावली. या हल्ल्यात घरातील इतर लोकही जखमी झाले आहेत.
३१ ऑक्टोबर १९८४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली होती, त्यानंतर दंगली उसळल्या होत्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App