पोलिसांचे छापे सुरूच, कधीही अटक होऊ शकते.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एका फरार गुन्हेगाराला पळून जाण्यास मदत करणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केला आहे. तेव्हापासून पोलिस त्यांना अटक करण्यासाठी सतत छापे टाकत आहेत. या कारवाईत जामिया नगर पोलिस स्टेशनसह जिल्हा आणि गुन्हे शाखेचे पथक सहभागी आहेत.
अमानतुल्ला खानवर बीएनएसच्या कलम १९१(२), १९०, २२१, १२१(१), १३२, ३५१(३), २६३, १११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यापैकी बरेच अजामीनपात्र आहेत. पोलिसांनी सांगितले की, आमदारावर गर्दी जमवून आणि बेकायदेशीर बैठकीत सहभागी होऊन वातावरण बिघडवल्याचा आरोप आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी जामिया परिसरात हत्येच्या प्रयत्नाचा आरोपी शाहबाज खानला अटक करण्यासाठी मोहीम सुरू केली. यादरम्यान, अमानतुल्ला खानच्या समर्थकांनी पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणला, ज्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले आणि शाहबाज खान घटनास्थळावरून पळून गेला. यानंतर पोलिसांनी आप आमदार आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला.
दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की अमानतुल्ला खानला कधीही अटक केली जाऊ शकते. त्यांच्या शोधात पोलिस विविध ठिकाणी छापे टाकत आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App