वृत्तसंस्था
नवी दिल्ली : इंडियाज गॉट लेटेंट कार्यक्रमांमध्ये अश्लील कमेंट केल्याबद्दल युट्युब कन्टेन्ट क्रिएटर रणवीर अलाहाबादिया या समय रैना या दोघांसह संबंधित शोमध्ये सामील झालेल्या सर्वांना आणि शो च्या निर्मात्यांना राष्ट्रीय महिला आयोगाने समन्स बजावले आहे. 17 फेब्रुवारीला राष्ट्रीय महिला आयोगामध्ये या सगळ्यांची सुनावणी ठेवली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय महिला आयोगाने ही कायदेशीर कारवाई केली आहे.
इंडियाज गॉट लेटेंट या शो मध्ये रणवीर अलाबादिया, समय रैना, अपूर्व मखिजा, जसप्रीत सिंग आशिष चंचलानी हे सामील झाले होते. तुषार पुजारी आणि सौरभ बोथरा या शो चे निर्माते आहेत. या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने शोच्या काँटेस्टंटला त्याच्या आई-वडिलांसंदर्भात अश्लील प्रश्न विचारला होता. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रणवीर विरुद्ध देशभर संताप उसळला.
National Commission for Women (NCW) summons YouTuber Ranveer Allahabadia, Samay Raina, and others over derogatory remarks; hearing scheduled for February 17 pic.twitter.com/m7Y9Xmez5q — ANI (@ANI) February 11, 2025
National Commission for Women (NCW) summons YouTuber Ranveer Allahabadia, Samay Raina, and others over derogatory remarks; hearing scheduled for February 17 pic.twitter.com/m7Y9Xmez5q
— ANI (@ANI) February 11, 2025
संसदेत देखील त्याचे पडसाद उमटले. त्याचे दोन मिलियन युट्युब फॉलोवर्स कमी झाले. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि मुंबईत त्याच्या घरी जाऊन तपासणी केली. दरम्यानच्या काळात रणवीरने व्हिडिओ जारी करत माफी मागितली. परंतु त्याच्याविरुद्धची कायदेशीर कारवाई थांबली नाही.
रणवीरने केलेली अश्लील कमेंट निंदनीय तर आहेच, पण भारतीय समाज व्यवस्थेने स्वीकारलेल्या मूल्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने वर उल्लेख केलेल्या सर्वांना समन्स बजावले. 17 फेब्रुवारीला त्या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगात सुनावणी ठेवली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App