अमेरिकेच्या माजी परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे माजी अधिकारी माइक बेंझ यांच्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बेंझ यांनी असा दावा केला आहे की मीडिया प्रभावाचा वापर करून, सोशल मीडिया सेन्सॉरशिपला प्रोत्साहन देऊन आणि विरोधी चळवळींना आर्थिक मदत देऊन अमेरिकेने भारत आणि बांगलादेशसह अनेक देशांच्या राजकारणावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेने निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा आणि सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनी केला.
यूएसएआयडीवरून सुरू असलेल्या वादात बेंझच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. ते म्हणतात की अमेरिकेने या कामावर खूप पैसा खर्च केला. बेंझच्या दाव्यानुसार, पंतप्रधान मोदींचा पक्ष भाजप यशस्वी होऊ नये म्हणून भारतातील २०१९ च्या लोकसभा निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. त्यांनी आरोप केला की फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअॅप आणि ट्विटर सारख्या विविध सोशल मीडिया कंपन्यांवर अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने मोदी समर्थक मजकूर ब्लॉक करण्यासाठी दबाव आणला होता. USAID ही अमेरिकन सरकारची एक स्वतंत्र संस्था आहे, जी विकसनशील देशांना आर्थिक आणि मानवतावादी मदत पुरवते.
गेल्या काही वर्षांत भारताच्या जवळजवळ सर्व शेजारील देशांमध्ये राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये सत्तेत खूप नाट्यमय बदल झाले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही, गेल्या ३ निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदाच स्वतःच्या बळावर बहुमत मिळाले नाही. अलिकडेच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आरोप केला होता की, यूएसएआयडीने भारताचे विभाजन करण्यासाठी अनेक संस्थांना निधी पुरवला आहे. अशा परिस्थितीत, पंतप्रधान मोदींना पराभूत करण्यासाठी अमेरिकेने कट रचल्याचा बेंझचा दावा दुबे यांच्या आरोपांना बळकटी देतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App