कौशल्य विकास घोटाळा 350 कोटी रुपयांचा असून या प्रकरणी 2021 मध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता.
विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना कौशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी CID ने आज सकाळी अटक केली आहे. ही अटक नंद्ययाल येथून करण्यात आली. कौशल्य विकास घोटाळा 350 कोटी रुपयांचा असून या प्रकरणी 2021 मध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता. चंद्राबाबू नायडू यांना CrPC कलम 50(1)(2) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. Former Chief Minister Chandrababu Naidu arrested what exactly is the ‘Skill Development Scam
जाणून घेऊयात कौशल्य विकास घोटाळा काय आहे ? –
तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारच्या अंतर्गत आंध्र प्रदेशमध्ये ही योजना सुरू करण्यात आली. हैदराबाद आणि आसपासच्या भागात असलेल्या अवजड उद्योगांमध्ये काम करण्यासाठी तरुणांना आवश्यक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याची ही योजना होती. सरकारने या योजनेंतर्गत सिमेन्स या कंपनीला त्याची जबाबदारी दिली होती. या योजनेंतर्गत सहा क्लस्टर तयार करण्यात आले असून त्यावर एकूण 3300 कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते. ज्यामध्ये प्रत्येक क्लस्टरसाठी 560 कोटी रुपये खर्च करायचे होते.
तत्कालीन चंद्राबाबू नायडू सरकारने मंत्रिमंडळाला सांगितले की या योजनेअंतर्गत राज्य सरकार एकूण खर्चाच्या 10 टक्के म्हणजेच 370 कोटी रुपये खर्च करेल. आणि उर्वरित 90 टक्के खर्च सीमेन्स ही कौशल्य विकास प्रशिक्षण कंपनी देणार आहे. चंद्राबाबू नायडू सरकारने या योजनेंतर्गत खर्च करण्यात येणारे ३७१ कोटी रुपये शेल कंपन्यांना हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. तसेच, शेल कंपन्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्यासंबंधीची कागदपत्रेही नष्ट केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्र्यांवर आहे.
आंध्र प्रदेशातील कौशल्य विकास घोटाळ्याचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी, ईडीने या घोटाळ्यातील आरोपी असलेल्या डिझाईनटेक सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडची 31 कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त केली होती. या कंपनीच्या माध्यमातून सरकारी योजनेचे पैसे शेल कंपन्यांकडे वर्ग करून बनावट पावत्याही तयार केल्याचा आरोप आहे.
ईडी या प्रकरणाची मनी लाँड्रिंगच्या दृष्टीकोनातून चौकशी करत आहे. या प्रकरणी ईडीने सीमेन्स कंपनीचे माजी एमडी सोम्याद्री शेखर बोस, डिझाईनटेक कंपनीचे एमडी विकास विनायक खानवेलकर, पीव्हीएसपी आयटी स्किल्स प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि स्किलर एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ मुकुल चंद्र अग्रवाल, सीए सुरेश गोयल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App