देशातील सर्वाधिक वयाच्या मानल्या जाणाऱ्या ढोली देवी यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आणि त्यांना कोणाताही त्रास झाल नाही. वयाच्या १२० व्या वर्षी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही त्यांना काहीही त्रास झाला नाही. मी लस घेऊ शकते तर इतर सर्वांनी घ्यायला काहीच हरकत नाही असे त्यांनी सांगितले.Fit even after 120 years woman got vaccination, a woman from Kashmir said, “I can get vaccinated, but not everyone?”
विशेष प्रतिनिधी
उधमपूर : देशातील सर्वाधिक वयाच्या मानल्या जाणाऱ्या ढोली देवी यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आणि त्यांना कोणाताही त्रास झाल नाही.
वयाच्या १२० व्या वर्षी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही त्यांना काहीही त्रास झाला नाही. मी लस घेऊ शकते तर इतर सर्वांनी घ्यायला काहीच हरकत नाही असे त्यांनी सांगितले.
उधमपूर जिल्ह्यातील डूडू या गावातील ढोली देवी यांनी शनिवारी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. ढोली देवी म्हणाल्या कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे.
त्याचबरोबर मास्क वापणे आणि घरी राहून शारीरिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. सरकारने केलेले नियम आपल्याच हिताचे आहेत, त्यांचे पालन करायला हवे.
ढोली देवी यांचे पणतू प्रदीप कुमार म्हणाले, त्यांच्या पणजीने शनिवारी लस घेतली. लस घेतल्यानंतर त्यांना खूप समाधान वाटले. त्याचबरोबर त्यांना काहीही त्रास झाला नाही. प्रत्येकानेच लसीकरण करून घ्यायला हवे.
जर माझ्या १२० वर्षांच्या पणजीला लसीमुळे काहीही त्रास झाला नाही याचा अर्थ लस पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे लोकांनी लसीकरणाबाबत भीती बाळगू नये, असे त्यांनी म्हटले आहे.
लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल योगेश कुमार यांनी ढोली देवी यांचा सत्कार केला. ते म्हणाले, त्यांनी देशवासियांसमोर आदर्श ठेवला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App