नाशिक : 1991 चा प्रार्थना स्थळ कायदा ही प्रतिक्रियात्मक भीतीपोटी उचललेले पाऊल होते. तो आता बदलता येईल. त्यात फार काही अवघड नाही. स्वतः नरसिंह राव जरी परत आले तरी ते स्वतःच तो कायदा बदलतील, असे प्रतिपादन अयोध्येतील राम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी केले आहे. Even if Narasimha Rao himself returns, the 1991 place of worship will change
ज्ञानवापी मशिदीच्या वादात आणि मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी – शाही ईदगाह वादात मुस्लिम पक्षाने 1991 च्या प्रार्थना स्थळ कायदाच आपल्या कोर्टातील युक्तिवादात प्रमुख मानला आहे. या पार्श्वभूमीवर स्वामी गोविंददेव गिरी यांनी या कायद्याबाबत भूमिका मांडली.
स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले, की राम जन्मभूमी – बाबरी मशीद वादाच्या वेळी आपण काहीतरी केले हे दाखविण्यासाठी 1991 चा कायदा नरसिंह राव यांनी आणला. त्यामागे समाजाच्या उद्रेक होण्याची भीती होती. पण आता काळ बदलला आहे. तशी परिस्थिती उरलेली नाही. शिवाय हा कायदा राज्यघटनेच्या मूळ भाग नाही. त्यामुळे तो बदलणे अवघड नाही.
अर्थात राम जन्मभूमी न्यासाची तशी मागणी नाही. ज्ञानवापी मशिदीचा वाद आणि मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी – शाही ईदगाह वाद सांमजस्याने सोडवावेत, हीच आमची भूमिका असल्याचे स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी स्पष्ट केले.
स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले :
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App