भारताला UNSCचे स्थायी सदस्यत्व न दिल्याने इलॉन मस्क यांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले…


शक्तिशाली देशांच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वाच्या भारताच्या दाव्याला आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अब्जाधीश इलॉन मस्क यांचा पाठिंबा मिळाला आहे. टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे मालक मस्क म्हणाले की, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे आणि त्याला संयुक्त राष्ट्रांमध्ये स्थायी सदस्यत्व न देणे हास्यास्पद आहे.Elon Musk expresses displeasure over India not being given permanent membership of UNSC

खरं तर, इलॉन मस्क यांनी हे मोठे विधान आफ्रिकेला संयुक्त राष्ट्रांचे स्थायी सदस्यत्व देण्याच्या मागणीबाबत संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी केलेल्या ट्विटच्या उत्तरात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिले आहे. ते म्हणाले की आम्हाला संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांमध्ये पुनरावलोकनाची गरज आहे.



इलॉन मस्क यांनी ट्विट केले की, ‘संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांचे पुनरावलोकन करण्याची गरज आहे. अडचण अशी आहे की ज्यांच्याकडे भरपूर शक्ती आहे ते (देश) हे सोडू इच्छित नाहीत. पृथ्वीवर सर्वाधिक लोकसंख्या असूनही भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व दिले जात नाही, हे हास्यास्पद आहे.

अँटोनियो गुटेरेस म्हणाले, ‘संस्थांनी आजचे जग प्रतिबिंबित केले पाहिजे, 80 वर्षांपूर्वीचे जग नाही. सप्टेंबरमध्ये होणारी शिखर परिषद जागतिक प्रशासनावर पुनर्विचार करण्याची आणि विश्वास पुनर्संचयित करण्याची संधी असेल. इलॉन मस्कचा हा पाठिंबा अशा वेळी आला आहे जेव्हा नुकतेच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वाबाबत मोठे वक्तव्य केले होते. जयशंकर म्हणाले होते, ‘जग काही सहजासहजी देत ​​नाही, कधी कधी घ्यावे लागते.’

आफ्रिकेलाही एकत्रितपणे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थान दिले पाहिजे. तत्पूर्वी, संयुक्त राष्ट्र महासचिवांनी ट्विट करून म्हटले होते की, ‘आफ्रिकेचा सुरक्षा परिषदेत एकही स्थायी सदस्य नाही हे आम्ही कसे मान्य करू?’

Elon Musk expresses displeasure over India not being given permanent membership of UNSC

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात