श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा जगभरात दीपोत्सव; पाकिस्तानाच्या बुडाला आगीचा जळफळाट!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अयोध्येत सोमवारी श्री रामलल्लांची भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली. 550 वर्षाची प्रतिक्षा संपली. याचा सगळ्या जगभरात उत्सव झाला. कोट्यावधी घरांमध्ये रामज्योत प्रज्ज्वलित झाली. पण त्याची आग पाकिस्तानच्या बुडाला लागली. त्या आगीत पाकिस्तानचा जळफळाट झाला.Deep Festival of Shree Ramlalla’s Life Pakistan’s Buda is on fire!!

भारतात घरा-घरात दीप प्रज्ज्वलन झाले. पण भारताच्या या आनंद पर्वावर पाकिस्तान कशी प्रतिक्रिया व्यक्त करणार??, याकडे अनेकांचे लक्ष होते. जगातील अनेक देशांनी राम मंदिराच्या उद्गाटनाबद्दल भारताला शुभेच्छा दिल्या. पाकिस्तानला अपेक्षेप्रमाणे त्रास झाला. पाकिस्तानला पोटदुखी झाली. चांगलाच जळफळाट झाला.



अयोध्येतील प्राण प्रतिष्ठेनंतर पाकिस्तानने अपेक्षेप्रमाणे टीका केली. “प्राणप्रतिष्ठा सोहळा हा भारतातील वाढत्या बहुसंख्यवादाचा संकेत आहे. मागच्या 31 वर्षात भारतात ज्या घटना घडल्या, त्यानंतर प्राणप्रतिष्ठेचा सोहळा बहुसंख्यवादाचा संकेत आहे. भारतीय मुस्लिमांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्टीने पिछाडीवर टाकण्याचा हा एक भाग आहे” असे पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने कार्यालयाने म्हटले आहे.

पाकिस्तानने काय गरळ ओकली??

“भारतात विस्तारत जाणाऱ्या हिंदुत्वाच्या विचारधारेमुळे धार्मिक सद्भव आणि क्षेत्रीय शांततेला गंभीर धोका आहे. धार्मिक आधारावर मुस्लिमांसह अल्पसंख्याक समुदाय आणि त्यांच्या धार्मिक स्थळांची सुरक्षा भारत सरकारने सुनिश्चित करावी.

वॉल स्ट्रीट जर्नलचा आगाऊपणा

अमेरिकन वर्तमानपत्र वॉल स्ट्रीटने मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला धर्मनिरपेक्ष नितीला निवडणुकीशी जोडलं आहे. वॉल स्ट्रीटने सुद्धा याला निवडणूक प्रचार ठरवला. ही घटना भारतातील हिंदुंना प्रभावित करेल आणि भाजपाला पुन्हा एकदा सत्तेत परतण्याची संधी मिळेल असं म्हटलं आहे. नेहरुंच्या धर्मनिरपेक्ष नितीचा सुद्धा उल्लेख आहे. मंदिर हिंदुंना एकजूट करेल की विभाजीत??, असा प्रश्नही अखेरीस केला.

Deep Festival of Shree Ramlalla’s Life Pakistan’s Buda is on fire!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात