Election 2024 : प्रशांत किशोर यांनी लोकसभा – 2024 निवडणुकीत नितीश कुमारांबाबत केले भाकीत

Prashant kishor and nitish kumar new

वारंवार भूमिका बदलणाऱ्या नितीश कुमारांची लोक आता चेष्टा करत आहेत, असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी 

पाटणा : 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध  लागले आहे. अशा परिस्थितीत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या एका वक्तव्याने जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.  प्रशांत किशोर यांंनी बिहारमध्ये जन सूरज पद यात्रेत मंगळवारी एका सभेला संबोधित करताना, 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत नितीश कुमार यांचे भविष्य वर्तवले आहे .  Election 2024  Prashant Kishor predicted about Nitish Kumar in Lok Sabha  2024 election

प्रशांत किशोर म्हणाले की, नितीश कुमार  इंडिया आघाडीत राहिले तरी त्यांची भूमिका मर्यादित असणार आहे. ते पुढे म्हणाले की,   मी बिहारच्या दृष्टीकोनातून बोललो तर नितीश कुमार यांच्या पक्षाच्या चिन्हावर पाच लोकही जिंकू शकणार नाहीत.  नितीशकुमार यांची प्रतिमा उरलेलीच नाही, बिहारमध्ये जेडीयूचे संघटन राहिले नाही. लोकांची जेडीयूवरची विश्वासार्हता आता संपली आहे.

निवडणुकीनंतर नितीश यांचा पक्ष टिकेल की नाही? ही  विचार करण्याची बाब आहे.  वारंवार भूमिका बदलणाऱ्या नितीश कुमारांची लोक आता चेष्टा करत आहेत, बिहारच्या जनतेला समजले आहे की नितीश कुमार यांना केवळ मुख्यमंत्री पद हवे आहे, त्यासाठी ते काहीही तडजोड करू शकतात.

Election 2024  Prashant Kishor predicted about Nitish Kumar in Lok Sabha  2024 election

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात