निपाह व्हायरसमुळे रुग्णांच्या मृत्यूनंतर केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडवर; केरळच्या मदतीसाठी पाठवले पथक


 विजयन सरकारने कोझिकोड जिल्ह्यात जारी केला अलर्ट

विशेष प्रतिनिधी

केरळ :  येथील कोझिकोड जिल्ह्यात निपाह व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी दिली. मांडविया म्हणाले की, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि निपाह व्हायरसच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारला मदत करण्यासाठी तज्ज्ञांची केंद्रीय टीम केरळला पाठवण्यात आली आहे. Central government on action mode after death of patients due to Nipah virus A team sent to help Kerala

कोझिकोड जिल्ह्यातील दोन जणांचा ‘अनैसर्गिक मृत्यू’ आढळून आल्यानंतर केरळ सरकारने पाच नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. जेणेकरून हे समजावे की हे नमुने निपाह व्हायरसची लागण झालेले आहेत की नाही. केरळच्या आरोग्य विभागाने सोमवारी कोझिकोड जिल्ह्यात दोन जणांच्या मृत्यूनंतर निपाह व्हायरसबाबत जिल्हास्तरीय अलर्ट जारी केला.

तपासणीसाठी जे नमूने पुण्यात पाठवण्यात आले  आहेत, त्यातील एक नमूना मृत व्यक्तीचा आणि चार त्याच्या कुटुंबीयांचे आहेत. या दरम्यान केरळ सरकारने मंगळवारी  कोझिकोडमध्ये एक नियंत्रण कक्ष स्थापित केला आणि नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने मास्कचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

Central government on action mode after death of patients due to Nipah virus A team sent to help Kerala

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात