Eknath Shinde एकनाथ शिंदे यांची माघार भविष्यातली राजकीय इन्व्हेस्टमेंट, पण तो तर खरा पोस्टर वरच्या मुख्यमंत्र्यांसाठी धडा!!


नाशिक : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतून माघार घेतली. त्याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क अनेकांनी लढवले. यामध्ये एकनाथ शिंदेंवरच्या दबावापासून ते त्यांनी केलेल्या राजकीय इन्व्हेस्टमेंट पर्यंत अनेक बाबी अनेकांनी समोर आणल्या. त्या प्रत्येकामध्ये थोडे थोडे तथ्य जरूर असले, तरी एकनाथ शिंदे यांनी माघार घेऊन स्वतःच्या भविष्याची राजकीय पेरणी केली असली, तरी तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या उतावळ्या पोस्टरवरच्या “भावी मुख्यमंत्र्यांनी” शिकायचा धडा ठरला आहे. Eknath Shinde’s withdrawal is a political investment in the future

शिवसेनेचे 40 आमदार असताना 105 आमदार असणाऱ्या भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले, पण निवडणुकीनंतर शिवसेनेचे 56 आमदार निवडून येऊन देखील एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडून दिला. यातून त्यांनी आपली राजकीय लवचिकता तर दाखवलीच, पण त्यापलीकडे जाऊन आपले कितीही कमी – जास्त आमदार निवडून येवोत, आपली नावे सतत पोस्टरवर “भावी मुख्यमंत्री” म्हणून झळकवायची हौस मिरवून घेणाऱ्या नेत्यांना त्यांनी आपल्या निर्णयातून जोरदार टोलाच हाणला.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर स्वतःचे विशिष्ट राजकीय कर्तृत्व आणि राजकीय लवचिकता लागते. राजकीय टाइमिंग साधावे लागते. मुख्य म्हणजे पोकळ स्वाभिमानाच्या गप्पा न मारता दिल्लीशी “पॉलिटिकल इक्वेशन” साधावे लागते, हे एकनाथ शिंदेंनी आपल्या बडबडीतून नाही, तर कृतीतून दाखवून दिले.


Sharad pawar मास्टर माईंड + जरांगेंचे नेहमीच माध्यमांमध्ये “मास्टर स्ट्रोक”; पण ऐनवेळी अवसानघातातून बाउंड्री वर कॅच आऊट!!


त्या उलट शरद पवारांच्या राष्ट्रवादी नावाच्या राजकीय प्रवृत्तीच्या नेत्यांची उताविळी एवढी वाढली की, आपले फक्त 10 आमदार निवडून आले, तरी महायुतीने अजितदादांना मुख्यमंत्री करायची सूचना रोहित पवारांनी करून टाकली. शेवटी अजितदादांना रोहित पवारांना फटकारावे लागले. आमचा पक्ष आणि आमची महायुती बघून घेऊ. बाकीच्या कोणी फुकटच्या सूचना करायची गरज नाही, असे अजितदादांना रोहित पवारांना फटकारावे लागले.

*रोहित पवार ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात, त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे फक्त 10 आमदार निवडून आले, पण निवडणुकीपूर्वी त्यांच्याच पक्षाचे सगळ्यात जास्त नेते “भावी मुख्यमंत्री” म्हणून महाराष्ट्रातल्या पोस्टरवर झळकत होते. त्यामध्ये सुप्रिया सुळे, जयंत पाटील, स्वतः रोहित पवार, मनोज जरांगेंना टाळी देऊन घरीच जावे लागलेले राजेश टोपे वगैरे नेत्यांचा या “भावी मुख्यमंत्र्यां”मध्ये समावेश होता. पण या “भावी मुख्यमंत्र्यांच्या” पक्षाची महाराष्ट्रातल्या मतदारांनी अशी काही वाट लावली, की शरद पवारांना त्यांच्या कारकिर्दीतली सर्वात लोवेस्ट परफॉर्मन्सची संख्या स्वतःच्या डोळ्यांनी बघावी लागली. पोस्टर वरचे कुठलेच “भावी मुख्यमंत्री” आमदारांची संख्या वाढविण्यात उपयोगी ठरू शकले नाहीत.

एकनाथ शिंदे यांचेही नाव त्यांच्या समर्थकांनी पोस्टरवर झळकवले होते. परंतु दोनच दिवसांमध्ये त्यांनी आपल्या समर्थकांना आणि आपल्या आमदारांना आपापल्या मतदारसंघात जायला सांगून आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या पोस्टर वरच्या नावांची शांतपणे “व्यवस्था” लावून टाकली. यातून देखील एकनाथ शिंदेंनी पोस्टरवरच्या “भावी मुख्यमंत्र्यांना” धडा शिकवला. नुसती पोस्टरवर नावे लिहून मुख्यमंत्री होता येणार नाही, असे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. पण एकनाथ शिंदेंनी शिकवलेला हा धडा शिकायचा की नाही हे पोस्टर वरच्या “भावी मुख्यमंत्र्यांना” मात्र ठरवावे लागेल!!

Eknath Shinde’s withdrawal is a political investment in the future

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात