कर्नाटकात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले.
विशेष प्रतिनिधी
बेंगळुरू: Ranya Rao रान्या राव सोने तस्करी प्रकरणासंदर्भात, गुरुवारी कर्नाटकात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. सोन्याच्या तस्करीच्या कथित रॅकेटशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून ईडीने गुरूवारी बंगळुरू आणि इतर काही ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणात कन्नड अभिनेत्री रान्या रावला अटक करण्यात आली आहे. सोन्याच्या तस्करी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानेही गुन्हा दाखल केला आहे.Ranya Rao
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या एफआयआर आणि डीआरआयच्या एका प्रकरणाची दखल घेत मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात रान्या रावला अटक करण्यात आली. बंगळुरूसह कर्नाटकात अनेक ठिकाणी ईडीचे छापे आणि शोधमोहीम सुरू आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने सीबीआय आणि डीआरआयच्या तपासाचा आधार घेतला आहे. या प्रकरणात, तपास संस्था गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेचा वापर कुठे केला गेला हे शोधून काढणार आहेत.
यासोबतच, गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेचा वापर जंगम किंवा अचल मालमत्ता खरेदी करण्यासाठी, व्हर्चुअल मनी खरेदी करण्यासाठी किंवा परदेशात गुंतवण्यासाठी केला गेला का? याचीही चौकशी केली जाईल. ईडी आरोपी आणि संबंधित लोकांच्या बँक खात्यांचीही चौकशी करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App