संसदीय समितीने वयोमर्यादेबाबत नवीन दिली माहिती
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Ayushman Vaya Vandana आयुष्मान वय वंदना कार्डसाठी ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयोमर्यादा आता ६० वर्षे आणि त्याहून अधिक अशी करण्याची शिफारस संसदीय समितीने केली आहे. भलेही लोकांच्या सामाजिक-आर्थिक स्थिती कोणतीही असो, आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेचा विस्तार करता आळा पाहिजे.Ayushman Vaya Vandana
आरोग्यसेवेवरील प्रचंड खर्च लक्षात घेऊन, आरोग्य आणि कुटुंब कल्याण संसदीय स्थायी समितीने बुधवारी राज्यसभेत आपला १६३ वा अहवाल सादर केला.
तसेच सध्याच्या आरोग्यसेवेच्या कव्हरमध्ये प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपयांवरून १० लाख रुपये प्रति कुटुंब करण्याची शिफारस केली आहे.
ह २९ ऑक्टोबर २०२४ रोजी, सरकारने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा विस्तार केला होता ज्यामुळे ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष करून दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ मिळू शकेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App