Pakistan : पाकिस्तानच्या दाव्याची पोलखोल, बलुचिस्तानच्या डोंगरात सापडले १०० हून अधिक मृतदेह!

पाक सैन्य खोटे बोलत आहे का?

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये झालेल्या रेल्वे अपहरणाच्या बाबतीत पाकिस्तानी लष्कराचे दावे उघड झाले आहेत. काल रात्री, पाकिस्तानी सैन्याने दावा केला की त्यांनी सर्व बलुच बंडखोरांना मारले आहे आणि सर्व ओलिसांची सुटका केली आहे. पण बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी लष्कराचे दावे फोल ठरवले आहे.

बीएलएच्या मते, १५० हून अधिक ओलिस अजूनही त्यांच्या ताब्यात आहेत. या ओलिसांमध्ये पाकिस्तानी लष्कराचे कर्मचारी आणि नागरिकांचाही समावेश आहे.

पाकिस्तानी सैन्याने दावा केला होता की २४ तासांहून अधिक काळ चाललेल्या कारवाईत, बलुच लिबरेशन आर्मीचे ३३ बंडखोर मारले गेले आणि महिला, वृद्ध आणि मुलांसह सर्व २१२ ओलिसांना सोडण्यात आले. तर पाकिस्तानी सैन्याच्या दाव्याचे खंडन करताना, बलुच लिबरेशन आर्मीने दावा केला आहे की त्यांच्या ताब्यात अजूनही १५० हून अधिक ओलिस आहेत.

बोलन न्यूजने स्थानिक सूत्रांचा हवाला देत दावा केला आहे की बीएलएने अजूनही अनेक पाकिस्तानी लष्करी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले आहे. प्रत्युत्तरादाखल, पाकिस्तानी लष्कराने मोठ्या प्रमाणात जमीनी आणि हवाई कारवाई सुरू केली आहे, ज्यामुळे या भागातील सर्व प्रवेश बंद झाला आहे.

Pakistan claim exposed more than 100 bodies found in the mountains of Balochistan

हत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात