विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या पार्थिवाच्या अपमानाचा कलंक पुसण्यासाठी आता मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचा इतमाम राखायचा इरादा आज समोर आला. पण हौदाने गेलेली अब्रू आता थेंबाने परत मिळवायचाच हा प्रकार ठरला.
काँग्रेसच्या गांधी परिवाराने नरसिंह राव यांच्याशी असलेल्या राजकीय वैराचा सूड त्यांच्या पार्थिवावर उगवला होता. त्यांच्या पार्थिवाला काँग्रेस मुख्यालयात म्हणजेच 24 अकबर रोड येथे आणायला सुद्धा नकार दिला होता. दिल्लीत राजघाट परिसरात नरसिंह राव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार होऊ नयेत यासाठी त्यांच्या परिवारावर हस्ते परहस्ते दबाव आणून नरसिंह राव यांचे पार्थिव हैदराबादला न्यायला लावले होते. तिथे शासकीय इतमामात त्यावेळच्या काँग्रेसच्या राज्य सरकारला त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करायला लावले होते. केंद्र सरकारचा कुठलाही प्रोटोकॉल यावेळी पाळला नव्हता.
Manoj Jarange : बीड मोर्चामध्ये जरांगे सारख्या जातीवादी माणसाला प्रवेश देऊ नये, नवनाथ वाघमारे यांचे टीकास्त्र
पण त्यामुळे गांधी परिवार आणि काँग्रेसवर संपूर्ण देशातून प्रचंड टीकेची झोड उठली होती. नरसिंह राव यांच्यासारख्या बृहस्पती विद्वान पंतप्रधानांचा गांधी परिवाराने सतत अपमान केल्याची बोच काँग्रेसला टोचली गेली. त्याची मोठी राजकीय किंमत काँग्रेसला मोजावी देखील लागली. नरसिंह राव यांच्या अपमानाचा राजकीय कलंक गांधी परिवार आणि काँग्रेसवर कायमचा चिकटला.
आता त्यांचे शिष्य मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाला दिल्लीतच राजघाट परिसरात अंतिम निरोप घेण्यासाठी काँग्रेसने केंद्र सरकारकडे विशिष्ट जागा मागितली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार प्रियांका गांधी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संपर्क साधून काँग्रेसची इच्छा बोलून दाखवली. मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या पार्थिवावर इतर पंतप्रधानांप्रमाणेच राजघाट परिसरात अंतिम संस्कार करावेत, अशी काँग्रेसची इच्छा आहे, असे त्यांना कळविले.
मनमोहन सिंग यांचे पार्थिव काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये 24 अकबर रोड येथे उद्या सकाळी 8.00 ते 9.30 या कालावधीत दर्शनासाठी ठेवून नंतर बाकी सगळे विधी करायचा काँग्रेसचा इरादा आहे. नरसिंह राव यांच्या पार्थिवाचा केलेला अपमान गांधी परिवाराचे वर्चस्व असलेल्या काँग्रेसला डाचत असल्यामुळेच काँग्रेसने मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाच्या बाबतीत आपला इरादा बदलल्याचे दिसून आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App