महाराष्ट्रात काय अर्धा – एक ग्रॅम ड्रग्ज पकडता? गुजरातकडे पहा; तिथल्या ड्रग्ज माफियांवरील प्रहारानंतर संजय राऊतांचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला सल्ला

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : गुजरातमध्ये पोलिसांनी गेल्या 58 दिवसांमध्ये ड्रग्ज माफियांवर कायद्याचा प्रहार करून 90 गुन्हेगारांना गजाआड केले आहे. त्यांच्याकडून साडेपाच हजार किलो पेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले आहे. Do you catch half a gram of drugs in Maharashtra? Look at Gujarat; Sanjay Raut’s advice to the Narcotics Control Bureau after the attack on the drug mafia there

अशा स्थितीत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोला सल्ला देऊन टाकला आहे. महाराष्ट्रात काय अर्धा एक ग्रॅम ड्रग्ज पकडत बसलात??!! तिकडे गुजरातमध्ये पहा हजारो किलो ड्रग्ज पकडली जातात. त्याचा अभ्यास करा, असा सल्ला संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला दिला आहे.



नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी सध्या महाराष्ट्रात आर्यन खान केससह 6 केसेसवर तपासाचे काम करत आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांचा जावई समीर खान याच्याही ड्रग्ज केसचा समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता_ गुजरातमध्ये हजारो किलो ड्रग्ज पकडले जात आहे. याचा अर्थ तिथली सिनेसृष्टी, तिथल्या श्रीमंतांची मुले यात अडकली असतील. त्यांचा शोध नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने घ्यावा. महाराष्ट्रात काय अर्धा ग्रॅम, एक ग्रॅम दोन ग्रॅम ड्रग्ज पकडत बसलात!!, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.

पण महाराष्ट्रातल्या पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात नेमकी काय कारवाई केली?, हा प्रश्न संजय राऊतांना पत्रकारांनी विचारला नाही. त्यामुळे त्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले नाही.

Do you catch half a gram of drugs in Maharashtra? Look at Gujarat; Sanjay Raut’s advice to the Narcotics Control Bureau after the attack on the drug mafia there

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub