विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविल्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत. दहशतवाद्यांना मिळणारी मदतही कमी झाल्याने दहशतवादी घटना कमी झाल्या आहेत. २०१९ च्या तुलनेत अतिरेकी घटनांमध्ये ७० टक्यांनी घट झाल्याची माहिती केंद्र सरकारने राज्यसभेत दिली.Deletion of Section 370 shows visible results, 70% reduction in terrorist incidents in Jammu and Kashmir
गेल्या अनेक वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांकडून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. सुरक्षा दलांवर हल्ले करण्यापर्यंत अतिरेक्यांची मजल गेली आहे. सार्वजनिक मालमत्तांनाही लक्ष्य केले जाते. या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ३७० कलम हटविण्याचा निर्णय घेतला.
यामुळे अतिरेक्यांना मिळणारे संरक्षण कमी झाले आहे. केंद्र सरकारने काश्मीर खोºयात संवादही सुरू केला आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून २००९ च्या तुलनेत अतिरेकी घटनांमध्ये ७० टक्के घट झाली आहे. २०१९ मध्ये २,२५८ घटना घडल्या होत्या. त्याचवेळी २०२० मध्ये ६६५ घटनांची नोंद झाली आहे.
केंद्र सरकारकडून जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या कारवायांचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळेच जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी आणि दहशतवादी घटना कमी झाल्या आहेत. २०१८ पासून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी आणि दहशतवादी घटनांमध्ये घट झाली आहे. आकडेवारीनुसार, २०१८ मध्ये घुसखोरीच्या एकूण १४३ घटना घडल्या, तर नोव्हेंबरपर्यंत घुसखोरीच्या केवळ २८ घटनांची नोंद झाली आहे.
गृह मंत्रालयाने सांगितले की, २०१८ मध्ये ४१७ दहशतवादी घटनांची नोंद झाली होती, तर यावर्षी (२१ नोव्हेंबरपर्यंत) २४४ दहशतवादी घटना घडल्या आहेत. एवढेच नाही, तर आॅक्टोबर २०२० ते आॅक्टोबर २०२१ पर्यंत ३२ सुरक्षा दलातील जवान आणि १९ जम्मू-काश्मीर पोलीस कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या घटनांमध्ये आपला जीव गमवावा लागला.
जम्मू-काश्मीरमध्ये नागरिकांवर हल्ले आणि काश्मिरी पंडितांना लक्ष्य करण्याच्या घटनांदरम्यान अलीकडेच ११५ काश्मिरी पंडितांनी काश्मीर सोडले. हे सर्व काश्मिरी पंडित आपापल्या कुटुंबासह जम्मूला गेले.
केंद्र सरकारने राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, काश्मीर सोडून जम्मूत गेलेले काश्मिरी पंडित हे सर्व सरकारी कर्मचारी आहेत. हिवाळ्याच्या सुरुवातीला सरकारी कर्मचारी अनेकदा काश्मीरमधून स्थलांतरित होतात आणि जम्मूमध्ये राहतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App