विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिक येथील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अखेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले आहे. फडणवीस यांच्यासोबतच महापौर सतीश कुलकर्णी यांनीही संमेलनाला येणार असल्याचे सांगितले आहे.Invitation to Fadnavis for Sahitya Sammelan, mediation by Chhagan Bhujbal
राजकीय मानापमान नाट्य दूर करण्यासाठी आता स्वत: पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी मध्यस्थी केली आहे. त्यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच महापौर कुलकर्णी यांनी संमेलनाला येण्याचे मान्य केले आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संमेलनासाठी निमंत्रण देणे अपेक्षित असताना, त्यांना तसेच नाशिकमध्ये असूनही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. त्यामुळे मंगळवारी महापौर सतीश कुलकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. संमेलनावर बहिष्कार घालण्याचे संकेतही महापौरांनी दिले होते.
या पार्श्वभूमीवर संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी बुधवारी सकाळी महापौर सतीश कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. महापौरांची नाराजी दूर झाल्याचा दावा पालकमंत्री भुजबळ यांनी केला आहे.
साहित्य संमेलनाबाबत विद्यमान महापौर सतीश कुलकर्णी यांची नाराजी पालकमंत्री छगन भुजबळ दूर करत नाहीत तोच माजी महापौर दशरथ पाटील यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. हे संमेलन कोणा एकाच्या मालकीचे नसून, अजूनही वेळ गेलेली नाही. सर्व राजकीय पक्षांना संमेलनात सहभागी करून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more