वृत्तसंस्था
मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ शहरामध्ये कोरोना मदतीच्या नावाखाली एक दोन नव्हे, तर तब्बल 400 लोकांचे सामूहिक धर्मांतर घडवून आणण्याचे कारस्थान उघडकीस आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा सिलसिला सुरू असल्याचे या धर्मांतराच्या जाळ्यात सापडलेल्या लोकांनी सांगितले आहे. या संदर्भात मेरिटमध्ये पोलिसात तक्रार झाली असून त्याची चौकशी करण्याच्या या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेशही पोलिसांनी दिले आहेत.Conspiracy of mass conversion of 400 people exposed in Meerut in the name of Corona aid; Police inquiry orders
उत्तर प्रदेश: मेरठ में कथित तौर पर अंधेरे में रखकर धर्म-परिवर्तन कराने का मामला आया। SP (सिटी) पीयूष सिंह ने बताया, "कुछ लोगों ने कहा गया कि उनको अंधेरे में रखकर धर्म परिवर्तन कराया गया है।लोगों के प्रार्थना पत्र पर अभियोग पंजीकृत करने के निर्देश जारी किए जा चुके हैं।" (28.10) pic.twitter.com/pz1nnUcXUA — ANI_HindiNews (@AHindinews) October 29, 2022
उत्तर प्रदेश: मेरठ में कथित तौर पर अंधेरे में रखकर धर्म-परिवर्तन कराने का मामला आया।
SP (सिटी) पीयूष सिंह ने बताया, "कुछ लोगों ने कहा गया कि उनको अंधेरे में रखकर धर्म परिवर्तन कराया गया है।लोगों के प्रार्थना पत्र पर अभियोग पंजीकृत करने के निर्देश जारी किए जा चुके हैं।" (28.10) pic.twitter.com/pz1nnUcXUA
— ANI_HindiNews (@AHindinews) October 29, 2022
मेरठ शहरातील मंगतपुरी आणि ब्रह्मपुरी भागात राहणाऱ्या लोकांना कोरोना काळात काम नव्हते. लोकांचे सर्वसामान्य जीवन जगणे कोरोना काळात कठीण झाले होते. त्यावेळी काही ख्रिस्ती धर्मगुरू मंगतपुरी आणि ब्रह्मपुरी भागातील वस्त्यांमध्ये आले. त्यांनी सुरुवातीला लोकांना पैसे आणि धान्याची मदत केली. सुरुवातीला त्यांचा मदतीद्वारे विश्वास संपादन केला आणि हळूहळू ख्रिस्ती धर्म प्रसार करायला सुरुवात केली. त्यानंतर लोकांच्या सनातन धर्मावरील विश्वास डळमळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या घरातील देवदेवतांचे फोटो मूर्ती हटवायला सुरुवात केली. लोकांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव वाढवायला सुरुवात केली.
हा प्रकार लोकांना असह्य झाल्यानंतर स्थानिक भाजप नेत्यांच्या मदतीने इथल्या लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी आणि तपास करण्याचे आदेश मेरठचे विशेष पोलीस महानिरीक्षक पियुष सिंह यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App