Conrad Sangma Profile : निवडणूक न लढता पहिल्यांदा बनले होते मुख्यमंत्री, जाणून घ्या कॉनराड संगमा यांच्याबद्दल सर्वकाही


नॅशनल पीपल्स पार्टीचे नेते कॉनराड संगमा यांनी मंगळवारी सकाळी मेघालयच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. संगमा सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याशिवाय भाजप अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. शिलाँग येथील राजभवनात झालेल्या शपथविधी समारंभात प्रेस्टन टायनसाँग आणि एस. धर यांनी मेघालयचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.Conrad Sangma Profile Became CM for the first time without contesting elections, know everything about Conrad Sangma

कोनराड संगमा यांचा जन्म 1977 मध्ये राज्यातील वेस्ट गारो हिल्सच्या तुरा शहरात झाला. त्यांचे वडील पीए संगमा हे मेघालयचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे अध्यक्षही होते. पीए संगमा यांनी राष्ट्रपतिपदाची निवडणूकही लढवली होती. कोनराड यांच्या मातोश्री सोरादिनी गृहिणी होत्या. कोनराड यांचा जन्म तुरा येथे झाला असला तरी ते दिल्लीत लहानाचे मोठे झाले. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सेंट कोलंबा शाळेत झाले. उच्च शिक्षणासाठी ते यूएसला गेले जेथे त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून उद्योजकीय व्यवस्थापन विषयात पदवी प्राप्त केली. त्यानंतर संगमा लंडनला गेले आणि त्यांनी तेथील इम्पीरियल कॉलेजमधून फायनान्समध्ये एमबीए केले.



समाजकार्याची आवड

संगमा राजकारणाव्यतिरिक्त पीए संगमा फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्याशी जोडले गेले आहेत. हे फाऊंडेशन पर्यावरण आणि शैक्षणिक सुधारणांसाठी कार्य करते. ग्रामीण मेघालयात या फाउंडेशनची 4 महाविद्यालयेदेखील आहेत. ते सध्या मेघालय क्रिकेट असोसिएशन आणि स्पोर्ट्स अकादमीचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. संगमा यांना इलेक्ट्रिक गिटार वाजवण्याची आवड आहे, ज्याचे व्हिडिओ ते सोशल मीडियावर अनेकदा शेअर करत असतात.

निवडणूक व्यवस्थापक म्हणून करिअरची सुरुवात

कोनराड यांनी 1990च्या दशकात त्यांचे वडील पीए संगमा यांचे निवडणूक प्रचार व्यवस्थापक म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली. 2004 मध्ये त्यांनी पहिली निवडणूक लढवली, ज्यात संगमा यांना 182 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. 2008च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर त्यांनी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये अर्थ आणि ऊर्जा यांसारख्या खात्यांचा कार्यभार स्वीकारला. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दहा दिवसांत राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. 2009 ते 2013 या काळात ते विधानसभेतील विरोधी पक्षनेतेही राहिले आहेत.

वडिलांच्या निधनानंतर झाले एनपीपीचे अध्यक्ष

मार्च 2016 मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्या वर्षी मे महिन्यात त्यांनी तुरा मतदारसंघातून लोकसभा पोटनिवडणूक लढवली आणि 1.92 लाख मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला. त्यांनी 2018 पासून दक्षिण तुरा मतदारसंघाचे आणि 2008 ते 2013 पर्यंत सेलसेला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

विधानसभेची निवडणूक लढवता झाले होते मुख्यमंत्री

2018 च्या विधानसभा निवडणुकीत संगमा यांच्या पक्षाला 19 जागा मिळाल्या होत्या. भाजपच्या राजकीय गणिताने त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत नेले. नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) अध्यक्ष कॉनराड संगमा आणि त्यांचे वडील आणि माजी लोकसभा अध्यक्ष पूर्णो ए. संगमा यांचा वारसा चालवत ते वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी मेघालयचे मुख्यमंत्री झाले. सर्वात विशेष म्हणजे संगमा यांनी गेल्यावेळी विधानसभा निवडणूकही लढवली नव्हती. नंतर ऑगस्ट 2018 मध्ये त्यांनी दक्षिण तुरा जागेसाठी पोटनिवडणूक लढवली आणि 8,400 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने त्यांचे जवळचे काँग्रेस प्रतिस्पर्धी शार्लोट मोमिन यांचा पराभव करून विधानसभेत पोहोचले.

भगिनी मनमोहन सरकारमध्ये होत्या मंत्री

माजी लोकसभा अध्यक्ष पीए संगमा यांच्या कन्या अगाथा या त्यांच्या राजकीय उत्तराधिकारी होणार होत्या, परंतु कोनराड यांनी त्यांच्या भगिनीला मागे टाकून पदभार स्वीकारला. अगाथा या मनमोहन सिंग सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होत्या. सरकारमधील सर्वात तरुण मंत्र्यांमध्ये अगाथा यांचा समावेश होता.

2023च्या निवडणुकीत एनपीपी सर्वात मोठा पक्ष

27 फेब्रुवारी रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोनराड संगमा यांच्या पक्ष एनपीपीने 26 जागा जिंकल्या. या निवडणुकीत नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, सीएम संगमा दक्षिण तुरा जागेवरून 5016 मतांनी विजयी झाले. भाजपने नंतर कॉनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील प्रादेशिक पक्षाला पाठिंबा दिला. भाजपच्या दोन आमदारांसह 45 आमदारांच्या पाठिंब्याने राज्यात एनपीपीच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार स्थापन केले.

Conrad Sangma Profile Became CM for the first time without contesting elections, know everything about Conrad Sangma

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात