भारत POK घेणार म्हटल्यावर काँग्रेस नेते कमलापती त्रिपाठींच्या नातवाच्या पोटात दुखले!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पाकिस्तानने बेकायदेशीरपणे भारताची बळकावलेली भूमी पाकिस्तान व्याप्त काश्मीर अर्थात POK परत मिळवण्यासाठी भारतीय संसदेने ठराव केला तो देखील काँग्रेस सरकारच्या काळात झाला परंतु आता केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर भारत POK पाकिस्तानकडून हिसकावून घेणार असे म्हटल्याबरोबर काँग्रेसच्याच एका माजी दिग्गज नेत्याच्या नातवाच्या पोटात दुखू लागले आणि POK ही परकीयांची भूमी आहे ती भारताने बळकाऊ नये, अशी मुक्ताफळे या नातवाने उधळली.Congress Leader Kamalapati Tripathi’s Grandson Stomach Hurts After Saying India Will Take POK!!

या नातवाचे नाव आहे ललितेश पती त्रिपाठी. त्यांचे आजोबा कमलापती त्रिपाठी एकेकाळी काँग्रेसचे दिग्गज नेते होते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे अतिशय निकटवर्ती होते इंदिरा गांधींनी आणीबाणी लादण्याआधी त्यांचेच नाव पंतप्रधान पदासाठी पुढे आले होते. राजीव गांधींच्या कारकीर्दीत ते काँग्रेसचे अखिल भारतीय कार्यकारी अध्यक्ष होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि केंद्रात अनेक वर्षे मंत्री अशी कमलापती त्रिपाठी यांनी कारकीर्द गाजवली.



पण त्यांचे नातू आणि तृणमूल काँग्रेसचे उत्तर प्रदेश मधल्या भदोई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ललितेश पती त्रिपाठी यांनी मात्र भारताने परकीय भूमी POK बळकाऊ नये, अशी मुक्ताफळे उधळली.

पाकिस्तान व्यक्त काश्मीर हा भारताचा भूभाग आहे, असा भारतीय संसदेने ठराव केला आहे. त्यामुळे संसदेचा ठराव पाळण्याचे आमचे कर्तव्य आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारताकडे खेचून घेण्याची जिद्द व्यक्त केली. मात्र त्यावर ललितेश पती त्रिपाठी यांनी प्रतिकूल मत व्यक्त केले.

ललितेश पती त्रिपाठी म्हणाले :

भाजपाला विकासाच्या मुद्यावर जनसमर्थन मिळत नाही. विकासाच्या मुद्यावरुन निवडणुकीला भरकटवण्यासाठीच सरकार असे वादग्रस्त मुद्दे काढते. भारत सरकार जर
POK परत घेण्याबद्दल बोलत असेल. याचाच अर्थ तुम्ही दुसऱ्या देशाची जमीन घेण्याची आणि युद्धाची घोषणा करताय.

POK हा एकेकाळी भारताचा भाग होता. पण एका राजकीय मंचावरुन युद्धाची घोषणा करु नये. देशाची बेसिक गोष्टींसाठी झुंज सुरु असताना ही युद्धावर जाण्याची वेळ नाही.

80 पैकी 79 सीट जिंकणार : अखिलेश

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. काँग्रेस पक्ष 17 जागांवर निवडणूक लढवत आहे. उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीच नेतृत्व समाजवादी पार्टीकडे आहे. समाजवादी पार्टी 62 जागांवर निवडणूक लढत आहे. भदोहीची सीट इंडिया आघाडीने काँग्रेससाठी सोडली आहे. ललितेश त्रिपाठी या जागेवरुन तृणमूळ काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. इंडिया आघाडी उत्तर प्रदेशात 80 पैकी 79 सीट जिंकणार, असा अखिलेश यादव यांचा दावा आहे.

काँग्रेस उमेदवार कितव्या नंबरवर होता?

भारतीय जनता पार्टीने भदोहीमधून विनोद कुमार बिंद यांना उमेदवारी दिली आहे. बहुजन समाज पार्टीकडून हरिशंकर निवडणूक रिंगणात आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या रमेशचंद बिंद यांना 5 लाख 10 हजार मत मिळाली होती. बिंद यांनी त्यावेळी बहुजन समाज पार्टीच्या रंगनाथ मिश्रा फार कमी फरकाने हरवलं होतं. तिसऱ्या नंबरवर काँग्रेस पक्षाकडून रमाकांत यादव होते. यादव यांना फक्त 25000 मे मिळाली होती.

Congress Leader Kamalapati Tripathi’s Grandson Stomach Hurts After Saying India Will Take POK!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात