विशेष प्रतिनिधी
मुंबई : Congress महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खुर्ची हादरविण्याची घोषणा केली.
वास्तविक महाराष्ट्रात काँग्रेसच्या निवडणुकीची सूत्रे तीन माजी “पडेल” मुख्यमंत्र्यांच्या हाती दिली आहेत. त्यातून महाविकास आघाडी अद्यापही चाचपडतच आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त 16 दिवसांची मुदत बाकी असताना महायुती किंवा महाविकास आघाडी यांनी जागावाटप देखील जाहीर केलेले नाही, पण काँग्रेस नेत्यांचा (ओव्हर)”कॉन्फिडन्स” असा की महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदींची खुर्ची हादरली पाहिजे!!
महाराष्ट्रात काँग्रेसने राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे निरीक्षक म्हणून विभागवार सूत्रे सोपविली आहेत. या सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत ती सगळी राज्ये गमवावी लागली. अशोक गेहलोत यांच्याकडे तर हरियाणाची देखील सूत्रे काँग्रेसने सोपविली होती. पण तिथे अनुकूल परिस्थिती असूनही काँग्रेसला निवडणूक जिंकता आली नाही. अशा “पडेल” माजी मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेसने महाराष्ट्रातील निवडणुकीची सूत्रे सोपविली आहेत.
या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र जोरदार मोठा दावा केला. महाराष्ट्रातील निवडणूक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी जिंकेल. संविधानाच्या बचावाची ही निवडणूक आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्राची निवडणूक जिंकल्यानंतर मोदींच्या कुबड्या गळून पडतील. त्यांच्या दिल्लीतल्या खुर्चीला हादरा बसेल, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App